INI CET July 2021 Date: जुलैच्या सत्रासाठी आयएनआय सीईटी तारखेची घोषणा, अधिकृत वेबसाईटवर जाणून घ्या माहिती

| Updated on: Mar 17, 2021 | 5:50 PM

आयएनआय सीईटी 8 मे 2021 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. (announcing the INI CET date for the July session, check on official website aiimsexams.ac.in)

INI CET July 2021 Date: जुलैच्या सत्रासाठी आयएनआय सीईटी तारखेची घोषणा, अधिकृत वेबसाईटवर जाणून घ्या माहिती
जुलैच्या सत्रासाठी आयएनआय सीईटी तारखेची घोषणा
Follow us on

नवी दिल्ली : ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(AIIMS New Delhi)कडून जुलैच्या सत्रासाठी इन्स्टिट्युट ऑफ नॅशनल इम्पॉन्सिटी कंबाईंड एन्ट्रन्स टेस्ट (INI CET July 2021)ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आयएनआय सीईटी 8 मे 2021 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत वेबसाईट aiimsexams.ac.in वर या संदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे. उमेदवार वेबसाईटला भेट देऊन ही माहिती तपासू शकतात. (announcing the INI CET date for the July session, check on official website aiimsexams.ac.in)

नोंदणीची अंतिम तारीख 31 मार्च रोजी

जुलैच्या सत्रासाठी ऑनलाईन नोंदणी आणि उमेदवारांची मूलभूत माहिती प्रक्रिया 1 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 31 मार्च 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अधिकृत वेबसाईट, iiimsexams.ac.in वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

यापूर्वी अर्ज केलेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केले आहे आणि ज्यांची नोंदणी आणि मूलभूत उमेदवाराची माहिती जानेवारी 2019, जुलै 2019, जानेवारी 2020, जुलै 2020 सत्र आणि जानेवारी 2021 सत्रासाठी मंजूर केली गेली आहे त्यांना पुन्हा नोंदणी आणि मूलभूत उमेदवार माहिती फॉर्म पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. या उमेदवारांना आयएनआय सीईटी जुलै 2021 च्या सत्रासाठी फ्रेश एक्झाम युनिक कोड(EUC)च्या जनरेशननंतरच अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया 23 मार्च ते 12 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होईल. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

या स्टेपने करा रजिस्ट्रेशन

ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट aiimsexams.ac.in पर लॉग इन करा. यानंतर होमपेजवर अकॅडमिक कोर्सेस लिंक वर क्लिक करा. नवीन पेज ओपन होईल. येथे INI-CET(MD/MS/MCh(6yrs)/DM(6yrs)) लिंक वर क्लिक करा. यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. येथे उपलब्ध रजिस्ट्रेशन/लॉग इन लिंकच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करु शकता. (announcing the INI CET date for the July session, check on official website aiimsexams.ac.in)

इतर बातम्या

RRB NTPC Phase 6 Exam 2021 : परीक्षा रद्द केलेल्या उमेदवारांसाठी रेल्वेकडून पर्यायी व्यवस्था

SBI PO Final Result 2020-21: स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, असा पाहा निकाल