नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जे विद्यार्थी यामुळं समाधानी नसतील त्यांच्या साठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. (CBSE 10th Exam 2021 Cancelled Ramesh Pokhariyal said how students will promoted)
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 4 मे पासून सुरु होऊन 14 जूनला संपणार होत्या. मात्र, त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत. शिक्षण मंत्रालयानं दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी एक प्रक्रिया बनवली जाईल. त्यानुसार निकाल तयार करुन त्यांना प्रमोट केलं जाईल. विद्यार्थ्यांना प्रमोट करताना दिले जाणारे गुण मान्य नसतील तर त्यांच्यासाठी शिक्षण मंत्रालयानं वेगळा मार्ग काढला आहे. शिक्षण मंत्रालय कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता कोरोना विषाणू संसर्ग कधी कमी होणार आणि परीक्षा घेतल्या जाणार हा प्रश्न आहे.
Today Hon’ble Prime Minister Shri @narendramodi Ji chaired a high-level meeting to review the examinations to be held at various levels in view of the developing Corona situation.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) April 14, 2021
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात 1 जूनला आढावा घेण्यात येईल. आढावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किमान 15 दिवासांचा कालावधी राहिल, अशा पद्धतीनं परीक्षेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.
सोनू सूदकडून विद्यार्थ्यांचं अभिनंदन
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसई बोर्ड परीक्षांबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर अभिनेता सोनू सूदनं ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अखेर हा निर्णय झाला. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, असं ट्विट केलं आहे. मात्र, सोनू सूदला विद्यार्थी आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात प्रश्न विचार आहेत.
संबंधित बातम्या:
(CBSE 10th Exam 2021 Cancelled Ramesh Pokhariyal said how students will promoted)