CBSE 12th Board Exam 2021नवी दिल्ली: सीबीएसईच्या बारावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्व परीक्षांबाबत उच्च स्तरीय बैठक पार पडली. भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची या बैठकीला उपस्थिती होती. शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भूषवलं.केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर देखील या बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhariyal Nishank) यांनी ही उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत राज्य सरकारांच्या अखत्यारीत येणाऱ्या परीक्षा मंडळाकडून अभिप्राय मागवण्याबाबत ठरल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे बैठकीत काही राज्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहता बारावीची परीक्षादेखील रद्द करण्याची मागणी केली यामध्ये दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ठामपणे भूमिका घेतली. बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करा, अथवा परीक्षाल रद्द करा, अशी मागणी देखील त्यांनी केली. ( CBSE 12th Board exams 2021 CBSE and ICSE boards will take decision after consultation with State and state boards on class 12 th exam)
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्य परीक्षा बोर्डांकडून अभिप्राय मागवला आहे. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालय त्यांचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. बारावीच्या जून महिन्याच्या शेवटी आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट आणि इतर रोगांचं वाढत प्रमाण पाहत परीक्षा नेमकी कधी होणार याबाबत साशंकता आहे.
नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री यांनी उच्च स्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षा घेण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण करुन घ्यावं, अशी मागणी केली. लसीकरणासाठी केंद्रानं फायजर कंपनीसोबत बोलावं. असा प्रस्ताव देखील मनीश सिसोदिया यांनी मांडला.
Centre should talk to Pfizer to explore vaccination for Class 12 students: Manish Sisodia at meeting on board exams
— Press Trust of India (@PTI_News) May 23, 2021
मुख्य विषयांची परीक्षा होणार?
सीबीएसईच्या उच्चस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाकडून बारावीच्या अभ्यासक्रमातील मुख्य विषयांचेच पेपर घेण्याबाबत चर्चा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. बोर्ड परीक्षा आयोजित करताना सर्व विषयांचे पेपर घेण्याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. यामध्ये तीन तासांसाठी वस्तूनिष्ठ आणि लहान प्रश्न विचारले जातील. यामुळे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त वेळ वर्गात थांबायला लागू नये, याबाबतही चर्चा झाल्याचं कळत आहे.
संबंधित बातम्या:
( CBSE 12th Board exams 2021 CBSE and ICSE boards will take decision after consultation with State and state boards on class 12 th exam)