नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhariyal Nihank) यांनी 2021 च्या CBSE परीक्षांबाबत महत्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड(CBSE) च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे (CBSE Exam Schedule) वेळापत्रक 2 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. (CBSE board exam 2021 Ramesh Pokhariyal Nishank to announce 10th 12th exam schedule on Feb 2)
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज सीबीएसईच्यी परीक्षांबाबत माहिती दिली. रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसईसी संलग्न असणाऱ्या शाळांचे अध्यक्ष आणि सचिवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 4 मे पासून सुरु होणार आहेत. परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत येणे अपेक्षित आहे.
देशातील नव्या शिक्षण धोरणात सहावीपासून व्होकेशन शिक्षण दिले जाणार आहे. सहावीत शिकत असल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं विचार करता येणार आहे. नवीन शिक्षण धोरण 2020 मुळे शालेय शिक्षणात होणाऱ्या बदलांविषयी ते बोलत होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती तयार होईल, असंही रमेश पोखरियाल म्हणाले.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 (CBSE Board examinations- 2021) ची प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्च रोजी होणार आहे. तर , लेखी परीक्षा 4 मे रोजी सुरु होतील त्या 10 जूनपर्यंत सुरु राहतील. तर, CBSE परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणे अपेक्षित आहे. शिक्षण मंत्र्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. CBSE च्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा करताना लवकरच सविस्तर वेळापत्रक लवकर वेबसाईटवर उपलब्ध होईल, असंही शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले होते. 10 वी आणि 12 वीच्या अंतर्गत मूल्यमापनाला 1 मार्च पासून सुरुवात होणार आहे.
2021 मधील सीबीएसईच्या परीक्षा लेखी पद्धतीने होतील, ऑनलाईन नाही, असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आधीच स्पष्ट करण्यात आले होते.दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे, याला रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी दुजोरा दिला. परीक्षा फेब्रुवारीच्या आधी होणार नाहीत, अशी ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी दिली.
Interacting with the Presidents and Secretaries of CBSE Sahodaya School Complexes. @cbseindia29 @EduMinOfIndia @PIB_India @MIB_India @DDNewslive @transformIndia @mygovindia https://t.co/JJr6H0xuC5
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) January 28, 2021
संबंधित बातम्या:
CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
CBSE board exam 2021 Ramesh Pokhariyal Nishank to announce 10th 12th exam schedule on Feb 2)