मुंबई : सीबीएसईची (CBSE Exam) दहावी आणि बारावीची (CBSE 10th & 12th Exam) परीक्षा येत्या मंगळवारपासून म्हणजेच 26 एप्रिलपासून होणार आहे. दरवर्षी एकदाच होणाऱ्या सीबीएसईची परीक्षा यावेळी दोन सत्रात होत आहेत. कोरोना महामारीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरु होईल. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं पार पडणार आहे. याआधी सीबीएसईची पहिल्या सत्राची परीक्षा झाली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या सत्रातील परिक्षा येत्या मंगळवार पासून सुरु होईल. दरम्यान, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीटाचे वाटपही (CBSE Exam Hall ticket) करण्यात आलं आहे. दहावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत तर बारावीची परीक्षा जूनपर्यंत चालणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्रात होणारी सीबीएससीची परीक्षा हे शाळेऐवजी अन्य परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य परिस्थिती घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांप्रमाणे परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हजेरी लावावी लागणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतली जाणारी दहावीची परीक्षा 24 मे पर्यंत चालणार आहे. तर बारावी परीक्षेचा शेवटचा पेपर हा 15 जून रोजी होईल. कोरोना महामारी आधी सीबीएसई बोर्डाची परीक्षा फक्त एकाच सत्रात होत होती. मात्र कोरोनामुळे ही परीक्षा दोन सत्रात घेतली जातेय.
डिसेंबर महिन्यामध्ये या परीक्षेचं पहिलं सत्र पार पडलं होतं.या परीक्षेसाठीचं हॉल तिकीटचं वाटपही विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठीची सर्व तयारीही करण्यासाठी आता परीक्षा केंद्रही सज्ज झाली आहे.
कोरोना काळात अनेक गोष्टी ऑनलाईन सुरु होत्या. शाळांसोबत परीक्षाही ऑफलाईन पार पडल्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा सगळं सुरु झालंय. कोरोनात बंद असलेल्या शाळा निर्बंध हटवल्यानंतर पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्या आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यानं आता विद्यार्थ्यांनाही नियमित पद्धतीनं परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी लिखाणाची सवय सुटलेल्या विद्यार्थ्यांना सरावावर भर द्यावा लागणार आहे.
दरम्यान, दिल्ली, हरियाणामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ पाहायला मिळते आहे. त्यापार्श्वभूमीवर या भागात मास्कही अनिवार्य करण्यात आला आहे. अशातच सीबीएसई परीक्षा घेण्यात येत असल्यानं या परीक्षा होणार की नाही, यावरुनही चित्र-विचित्र चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान, लिखाणाचा सराव सुटलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली होती. ही मागणी काही दिवसांपूर्वी फेटाळून लावत मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दिलासादायक निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांनी प्रति तास पंधरा मिनिटांचा वेळ परीक्षेवेळी अतिरीक्त देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय फक्त यंदाचा परीक्षेपुरता मर्यादित असेल, असंही सांगण्यात आलं होतं. कोरोना काळात सर्वच शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या होत्या.
MHT-CET : उदय सामंतांकडून बातमी, विद्यार्थी खुश ! परीक्षा पुढे ढकलण्यात आली, ट्विटरवरून दिली माहिती
Jobs : नगरकरांनो ‘ही’ संधी सोडू नका ! वेगवेगळ्या पदांसाठी भरती, 24 रिक्त पदं, शेवटची तारीख 26 एप्रिल