नवी दिल्ली : कोरोना माहामारीमुळे राज्यासह देशातील काही परीक्षा लांबणीवर पडल्या. तर कही परीक्षा थेट रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता CBSE Board नेसुद्धा मोठा निर्णय घेतला होता. बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. परीक्षा रद्द केल्यामुळे देशातील सर्व विद्यर्थ्यांना प्रमोट केले जाईल असे सांगण्यात आले होते. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी नेमकी कोणती प्रणाली वापरली जाईल. त्यासाठी निकष काय असतील याचे कोडे सर्वांनाच पडले होते. या कोड्यावर सीबीईसई बोर्डाने आता पडदा पाडला आहे. बोर्डाने आपल्या साईटवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. यानुसार प्रत्येक शाळेत एक रिझल्ट समिती निश्चित करण्यात येणार आहे. ही समितीच विद्यार्थ्यांचे गुणांकन करेल. (CBSE SSC 10th class exam assessment procedures released by CBSE board on its official website)
सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांना गूण देण्यासाठी पद्धत काय असावी याबाबत आपल्या वेबसाईटवर सविस्तरपणे सांगितलं आहे. ही सर्व माहिती cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
1) प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती नेमण्यात येईल. यामध्ये शाळेचे प्राचार्य आणि एकूण 7 शिक्षक असतील. 7 शिक्षकांमध्ये 5 शिक्षक हे शाळेतील तर 2 शिक्षक हे दुसऱ्या जवळच्या शाळेतील नेमण्यात येतील.
2) प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयासाठी 100 पैकी मार्क्स दिले जातील. यामध्ये 20 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी असतील. तर बाकीचे 80 रिझल्ट समिती देईल. बहुतांश शाळांमध्ये इटरनल असेसमेंटची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्या शाळांनी इंटरनल असेसमेंटचे मार्क सीबीएसई पोर्टलवर अपलोड केलेले नाहीत. त्यांना ते 11 जून 2021 पर्यंत अपलोड करणे बंधनकारक असेल.
3) चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थाने विविध परीक्षांमध्ये मिळवलेले गुण यांच्या आधारवर बाकीच्या 80 गुणांपैकी गुण दिले जातील.
4) या सर्व प्रक्रियेत पारदर्शकपता, सत्यता असणे गरजेचे आहे. त्यासाठी सीबीएसई बोर्डाकडून शाळेने दिलेल्या गुणांचे मूल्यांकन केले जाऊ शकते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सीबीएसई बोर्ड 10 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करेल याबाबतचे कोडे सर्वांना पडले होते. त्यावर आता पडदा पाडला आहे. मूल्यांकनाविषयी अधिकची माहिती सीबीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
इतर बातम्या :
ICSI CSEET Admit Card 2021 : आयसीएसआय सीएसईईटी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून करा डाउनलोड
बारावीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज शक्य, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय
(CBSE SSC 10th class exam assessment procedures released by CBSE board on its official website)