CISCE Class 12 Exam 2021 Cancelled : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता सीआयएससीई (CISCE) नेसुद्धा 12 बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. देशातील सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता हा निर्णय घेण्याता आला. या निर्णयानंतर आता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर काम केले जाणार आहे. (CISCE class 12 exam 2021 cancelled now board will work on result after CBSE decision)
Indian School Certificate (ISC) Board examinations (Class 12) have been cancelled. The final decision on compiling results is yet to be taken: Dr G Immanuel, Chairman, Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) to ANI pic.twitter.com/1NACHGP9IR
— ANI (@ANI) June 1, 2021
काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. या निर्णयाबाबत CISCE चे अध्यक्ष डॉ. जी. इमॅन्युएल (Dr G Immanuel) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना कोणत्या निकषांवर गुण द्यावेत तसेच त्यांचा निकाल कसा तयार करावा याबाबत निर्णय बाकी असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठीचे निकष तसेच गुणांकन पद्धती लवकरच ठरवली जाईल, असे इमॅन्युएल म्हणाले.
देशात कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे अशा बिकट परिस्थितीत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे जिकरीचे ठरु शकते, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात होते. परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी अनेक विद्यार्थी तसेच पालक करत होते. याच पार्श्वभूमीवर आज (1 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या निर्णयानंतर आता CISCE नेसुद्धा 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
इतर बातम्या :
CBSE Board 12 Exam cancelled: बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय
(CISCE class 12 exam 2021 cancelled now board will work on result after CBSE decision)