मुंबई – दोन वर्षे कोरोनाच्या काळात शिक्षण क्षेत्रात जो गोंधळ होता. तो अद्याप पुर्णपणे संपलेला नाही. दहावीच्या सीबीएसई (CBSC) आणि आरसीएसईची (RCSE) परीक्षा 23 मे आणि 24 मे रोजी संपली. जोपर्यंत बोर्डाचे निकाल जाहीर होत नाहीत. तोपर्यंत अकरावीचा ऑनलाईन प्रवेश करू नका अशी मागणी सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी-पालकांची मागणी आहे. विशेष म्हणजे 30 मे पासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी सुरू झाली असून बोर्डाचे विद्यार्थी अर्जाचा भाग एक भरत आहेत. एसएससी विद्यार्थ्यांना (SSC Student) फक्त अर्ज भरता येत आहेत. तर इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाही. त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना अर्ज भरता येईल.
अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी करीत आहेत. सध्या सुरू असलेली प्रक्रिया दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देखील सुरू राहणार आहे. त्यामुळे सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी-पालकांनी घाबरून जायचं काहीचं कारण नाही.
30 मे पासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी अनेक विद्यार्थींनी केली असून अद्याप अधिकृत कोणतीही आकडेवारी शिक्षण विभागाने जाहीर केलेली नाही.
प्रवेश प्रक्रिया खूप दिवस चालणार असून सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांना देखील नोंदणी करता येणार आहे