मुंबई – मागच्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाच्या (Corona) संसर्गामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान झाल्याची पालकांची ओरड आहे. त्यातचं दोन वर्षात अनेकदा शाळा सुरू झाल्या आणि बंद देखील करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाने तिथल्या परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असे आदेश शासन दरबारी काढण्यात आले. यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू वेळेत सुरू होतं आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने (Education Department) काढलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत शिक्षकांना दोन दिवस आगोदर शाळा भरवली आहे. शासनाच्या आदेशानुसार 15 जूनला शाळा सुरू करणं अपेक्षित होतं. परंतु यंदा शाळा 13 जूनला सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागाने 13 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले करण्याचं आदेशात म्हटलं आहे. परंतु वर्ग भरवण्याची सुचना 15 जूनपासून देण्यात आली आहे. पण मुंबईतल्या (Mumbai) अनेक शाळांनी 13 जूनपासून वर्ग भरवले आहेत.
वाढता कोरोना लक्षात घेता शिक्षकांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी हे सुद्धा आवर्जुन सांगितलं आहे. विशेष म्हणजे पहिल्यांचं दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांचे निकाल देण्यात आले त्याचवेळी पालक आणि विद्यार्थ्यांना 13 जूनला शाळा भरवणार असल्याचं शिक्षकांनी सांगितलं होतं.त्यामुळे मुंबईतील खासगी शाळा आणि मुंबई पालिकेतील शाळेतील वर्ग भरल्याचे पाहायला मिळाले. संपुर्ण शाळेचे सॅनिटायझेशन, स्वच्छता ही कामे वेळेत करण्यात आली. पहिल्या दिवशी सगळेचं उपस्थित असल्याने शाळेची सगळी कामे करण्यात आली. आठवडाभरानंतर विद्यार्थांना 27 विद्यार्थ्यांचे वस्तू वाटप करण्यात येणार आहे.
मे महिन्यात पु्न्हा कोरोनाने डोकेवरती काढले आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास नियमावली लागू कऱणार असल्याचं प्रशासनाने जाहीर केलं आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर लोकांच्या चाचण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत.
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पहिल्याचं दिवशी पालकांनी कोरोनाबाबत मार्गदर्शन केलं.