मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षांचे (Exam) निकाल (result) लागले असून, आता विद्यार्थी (students)आणि पालकांची प्रवेश घेण्यासाठी घाई सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आपल्याला आपल्या आवडत्या शाखेत तसेच महाविद्यालयातच प्रवेश मिळावा असे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र यंदाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचा भाग एक भरूनही, तब्बल 11 हजार 930 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भागच भरला नाही. दुसरा भाग हा महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाशी संबंधित आहे. प्रवेश अर्जात पसंतीक्रम न नोंदविल्यामुळे प्रवेशाच्या संधीपासून हे विद्यार्थी वंचित राहून नयेत, म्हणून आता पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने येत्या शनिवारपर्यंत म्हणजेच 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सध्या राज्यातील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यासाठी नियमित प्रवेश फेरी क्रमांक एकसाठीचे वेळापत्रक संचालनालयाकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना भाग एक आणि भाग दोन अशा दोन टप्प्यांत अर्ज भरायचा आहे. मात्र राज्यातील तब्बल 11 हजार 930 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भागच भरला नाही. दुसरा भाग हा महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाशी संबंधित आहे. त्यामुळे महाविद्यालय न निवडल्याने हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी आता पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने येत्या शनिवारपर्यंत म्हणजेच 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्जाचा दुसरा भाग भरला नाही, त्यांना आता उद्यापर्यंत अर्ज भरण्याची संधी आहे.
दरम्यान पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने येत्या शनिवारपर्यंत म्हणजेच 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विविध कारणांमुळे जे विद्यार्थी अर्जाचा भाग दोन भरू शकले नाहीत, त्यांना आता आणखी दोन दिवस अर्ज करता येणार आहे.