मुंबई: फेब्रुवारी महिन्यामध्ये 5,6,7,12,13 आणि 14 तारखेला GATE 2021 परीक्षा पार पडली. इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईकडून ही परीक्षा घेण्यात आली. GATE 2021 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना यापूर्वी 2 मार्च ते 4 मार्च दरम्यान इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्या वेबसाईटवर जाऊन आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी GATE परीक्षा दिली असेल ते www.gate.iitb.ac.in या वेबसाईटवर 22 मार्चला निकाल पाहू शकतात. (GATE 2021 IIT Bombay declared final answer key result announced on gate iitb ac in on 22 march )
GATE म्हणजेच ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरींग 2021 परीक्षा अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्याशाखांमधील प्रवेशांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. विद्यार्थ्यांना आयआयटी, मुंबईच्या वेबसाईटवर जाऊन अंतिम उत्तरतालिका पाहता येईल.
GATE परीक्षेचा निकाल 22 मार्च 2021 ला जाहीर होणार आहे. GATE परीक्षेच्या अधिक माहितीसाठी सातत्यानं IIT GATE च्या वेबसाईटला भेट द्या. इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहती, खरगपूर, कानपूर, मद्रास, रुरकी यांच्याकडून दरवर्षी रोटेशन पद्धतीनं परीक्षेचे आयोजन करण्यात येते. GATE 2021 ची परीक्षा आयआयटी मुंबईकडून घेतली गेली आहे. यंदाची गेट परिक्षा 27 विषयांमध्ये घेतली गेली.
गेट परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी प्रथम सर्व उमेदवारांनी गेटची अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. होम पेजवर GATE 2021 Result लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन विंडो उघडेल. तिथे तुमचा अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. यानंतर निकाल स्क्रीनवर दिसून येईल. GATE 2021 चा निकाल डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचा प्रिंटआउट घ्या.
GATE Final Answer Key 2021 इथे क्लिक करा
Photo : ‘शिवलिंग, गाय-वासरु, कट्यार, सुर्य चंद्राचे शिल्पांकन…’,जत तालुक्यात सापडला चालुक्य सम्राट विक्रमादित्य यांच्या कारकीर्दीतील शिलालेखhttps://t.co/oxoWgxw15z#sculpture #Vikramaditya
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2021
संबंधित बातम्या:
GATE 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड
CTET 2021 : लवकरच जारी होणार Answer Key, कसे कराल डाऊनलोड?
(GATE 2021 IIT Bombay declared final answer key result announced on gate iitb ac in on 22 march )