GATE Result 2021 Date: गेट परीक्षेचा निकाल या दिवशी होणार जाहीर, gate.iitb.ac.in या वेबसाईटवर चेक करा

| Updated on: Mar 19, 2021 | 12:03 PM

GATE Result 2021 Date latest update: यावर्षी 9 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. (GATE exam results will be announced soon, check on the official website)

GATE Result 2021 Date: गेट परीक्षेचा निकाल या दिवशी होणार जाहीर, gate.iitb.ac.in या वेबसाईटवर चेक करा
गेट परीक्षेचा निकाल या दिवशी होणार जाहीर
Follow us on

नवी दिल्ली : अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE 2021 Exam) परीक्षेचा निकाल 22 मार्च 2021 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत पोर्टल gate.iitb.ac.in वर जाऊन आवश्यक तपशील प्रविष्ट करुन निकाल तपासू शकतात. याशिवाय आपण खाली दिलेल्या माहितीची वापर करुन आपण निकाल तपासू शकता. (GATE exam results will be announced soon, check on the official website)

असा पहा GATE  परीक्षेचा निकाल (How to Check GATE 2021 Result)

गेट परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी प्रथम सर्व उमेदवारांनी गेटची अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जावं. मग होम पेजवर GATE 2021 Result  लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन विंडो उघडेल. आपला अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड येथे प्रविष्ट करा. यानंतर लॉगिन यशस्वी झाल्यावर त्याचा परिणाम स्क्रीनवर दिसून येईल. यानंतर, गेट 2021 चा निकाल डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचा प्रिंटआउट घ्या.

फेब्रुवारीमध्ये जाहीर केली होती उत्तरपत्रिका

गेट परीक्षा 2021 ची उत्तरपत्रिका 26 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना 4 मार्च 2021 पर्यंत हरकती घेण्यास परवानगी देण्यात आली. या हरकतींचा आढावा घेतल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. यावर्षी 9 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. एकूण विद्यार्थ्यांपैकी 78 टक्के विद्यार्थी या परीक्षेला बसले. गेट परीक्षा 2021 स्कोरकार्ड तीन वर्षांसाठी वैध असेल.

एकूण 27 पेपर्ससाठी परीक्षा

ही परीक्षा एकूण 27 पेपर्ससाठी घेण्यात आली होती, त्यामध्ये दोन नवीन विषय समाविष्ट करण्यात आले होते. या विषयात पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि ह्युमॅनिटिज आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. तसेच कोविड -19 महामारीमुळे गेट 2021 मध्ये अर्ज करण्यासाठी किमान पात्रतेत सवलत देण्यात आली होती. घोषणेनुसार, पदव्युत्तर पदवीसाठी तृतीय वर्षाचे उमेदवार गेट 2021 साठी पात्र होते.

इतर बातम्या

परभणी जिल्ह्यात 2 दिवसाचा लॉकडाऊन

अप्पर लीप्सच्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

(GATE exam results will be announced soon, check on the official website)