नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने GPAT परीक्षा 2021 साठी अॅडमिट कार्ड (NTA GPAT Admit Card 2021) जारी केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट फार्मससीअॅप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेसाठी अर्ज केला असेल ते एनटीएच्या वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरला सुरु झाली होती.
ग्रॅज्युएट फार्मससी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) चे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून करण्यात आलं आहे. ही परीक्षा 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. फार्मसी अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर वर्गांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. 2018 नंतर या परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडे देण्यात आली आहे. ( Graduate Pharmacy Aptitude Test 2021 admit card released know how to download)
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या ग्रॅज्युएट फार्मससी अॅप्टिट्यूड टेस्ट 2021 चं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना एनटीएच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या टिप्सचा वापर करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.
1. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर gpat.nta.nic.in वर भेट द्यावी.
2. या वेबपेजवर Download Admit Card for GPAT 2021 यावर क्लिक करावे
3. यानंतर ओपन झालेल्या लॉगीन विंडोमध्ये अर्ज कर्माक आणि जन्मतारीख टाकून प्रवेशपत्र डाऊनलोड करावं.
4. परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी GPAT च्या अधिकृत वेबसाईटवरुन देखील अॅडमिट कार्ड पाहू शकतातय
परीक्षेचे स्वरुप
ग्रॅज्युएट फार्मससी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) परीक्षेत 125 प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. ही परीक्षा देशातील विविध राज्यांमध्ये आयोजित केलेी जाते. उत्तर प्रदेशातील आग्रा, नोएडा, इलाहाबाद, बरेली, गाझियाबाद, गोरखपूर, ग्रेटर नोएडा, लखनऊ, वाराणसी, कानपूर आणि मेरठ मध्ये होईल.
राजस्थानातील जयपूर, जोधपूर, कोटा आणि उदयपूर शहरातदेखीलग्रॅज्युएट फार्मससी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) परीक्षा घेतली जाईल. याशिवाय मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड आणि इतर राज्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे.
NYKS Recruitment 2021: कोणत्याही परीक्षेशिवाय 10 वी पासना मिळतेय नोकरी; आताच अर्ज करा#NYKSRecruitment #NehruYuvaKendraVolunteer https://t.co/LSOI3FdOB3
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2021
संबंधित बातम्या:
आधार कार्ड डाऊनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग; फक्त करा एक काम
( Graduate Pharmacy Aptitude Test 2021 admit card released know how to download)