आता पदवीचे विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार अभ्यासाचा कालावधी कमी करू शकतात किंवा वाढवू शकतात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नुकत्याच झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे. यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च शिक्षण संस्था लवकरच पदवी (UG) विद्यार्थ्यांसमोर अभ्यासक्रमांचा कालावधी कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा पर्याय सादर करू शकतील.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या आठवड्यात झालेल्या बैठकीत उच्च शिक्षण संस्थांसाठी त्वरित पदवी कार्यक्रम (ADP) आणि विस्तारित पदवी कार्यक्रम (EDP) देण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरला (SOP) मान्यता दिली.
कुमार म्हणाले की, या पदवींमध्ये अभ्यासक्रमांचा विस्तार किंवा कपात निश्चित केली जाईल आणि या पदव्या पुढील शिक्षण किंवा रोजगारासाठी विहित कालावधीच्या पदवीच्या समकक्ष मानल्या जातील.
विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार अभ्यासाचा कालावधी कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी हा पर्याय वापरू शकतात.
ADP (एक्सलरेटेड डिग्री प्रोग्रॅम) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रति सेमिस्टर अतिरिक्त क्रेडिट मिळवून तीन वर्षांचा किंवा चार वर्षांचा अभ्यासक्रम कमी वेळात पूर्ण करण्याचा पर्याय असेल, तर EDP मध्ये प्रति सेमिस्टर कमी क्रेडिट मिळवून अभ्यासक्रमाचा कालावधी वाढविण्याचा पर्याय असेल.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या आठवड्यात झालेल्या बैठकीत उच्च शिक्षण संस्थांसाठी त्वरित पदवी कार्यक्रम (ADP) आणि विस्तारित पदवी कार्यक्रम (EDP) देण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरला (SOP) मान्यता दिल्याने आता विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम पर्याय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. कारण, आता पदवीचे विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार अभ्यासाचा कालावधी कमी करू शकतात किंवा वाढवू शकतात. विशेष म्हणजे या पदवींमध्ये अभ्यासक्रमांचा विस्तार किंवा कपात निश्चित केली जाईल आणि या पदव्या पुढील शिक्षण किंवा रोजगारासाठी विहित कालावधीच्या पदवीच्या समकक्ष मानल्या जातील, असं यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी म्हटलं आहे.
हे नवे ADP आणि EDP पर्याय कधीपासून लागू होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता याबाबत माहिती समोर आली आहे. यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च शिक्षण संस्था लवकरच पदवी (UG) विद्यार्थ्यांसमोर अभ्यासक्रमांचा कालावधी कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा पर्याय सादर करू शकतील.