नंदुरबार: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने या पावसाचा (Rain) सर्वाधिक फटका हा नवापूर तालुक्याला बसला असून तालुक्यातील अनेक गावातील लहान-मोठ्या पुलांचं काम सुरु होतं मात्र त्यासाठी पर्यायी मार्ग ठेकेदारांनी केला नाही. तर दुसरीकडे पहिल्याच पावसात अनेक लहान-मोठे पूल (Bridge) पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने जवळपास 10 गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र हे पूल दुरुस्ती होत नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना (School Students) याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये जिल्ह्यासाठी येत असतात. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी सर्वांचीच अपेक्षा असते मात्र जिल्ह्यात पहिल्याच पावसात रस्त्यांची दुर्दशा झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून खांद्यावर बसा अन् शाळेत जा प्रशासन काही करणार नाही असंच काही पालकांना आपल्या मुलांना सांगावं लागतंय. त्यासोबतच अनेक वाहनधारकांचे देखील हाल झालेले आहेत. काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेले आहेत मात्र तरीदेखील प्रशासन काय झोपलेलं आहेका की काही दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे असाच प्रश्न पालकवर्ग करत आहेत.