JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक सुवर्णसंधी, IIT Bombay ने Registration ची मुदत वाढवली

| Updated on: Aug 12, 2022 | 12:20 PM

II Bombay ने JEE Advanced 2022 परीक्षेच्या नाव नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप यासाठी नोंदणी केलेली नाही त्यामुळे त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.

JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक सुवर्णसंधी, IIT Bombay ने Registration ची मुदत वाढवली
Follow us on

मुंबईः संयुक्त प्रवेश परीक्षा JEE Advanced 2022 साठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यासाठी ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांना आता आणखी एक संधी मिळणार आहे. II Bombay कडून अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी उमेदवार आता 12 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइट jeeadv.nic.in या लिंकवर (Link) जाऊन अर्ज करू शकणार आहेत. JEE Advanced 2022 ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. पहिल्या JEE Advanced साठी नोंदणी तारीख 11 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर २.५ लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

JEE Advanced साठी नोंदणी यानुसार करा?

तुम्ही jeeadv.ac.in या JEE Advanced च्या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंर ऑनलाइन नोंदणी होणार आहे.

registration link वर क्लिक करा आणि अर्ज भरा.

तुमचे Username आणि Password तयार झाल्यानंतर तो Sve करा .

नंतर वापरकर्तानी आणि पासवर्डसह लॉगिन करा आणि JEE Advanced फॉर्म भरण्यास सुरुवात करा.

फोटो, स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर फी भरा आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.

JEE Advanced परीक्षा कधी आणि कोणत्या वेळी घेणार?

JEE Mains ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे, त्यामुळे JEE Advanced Admit Card परीक्षेच्या एक आठवडा आधी जाहीर होणे अपेक्षित आहे. IIT JEE म्हणजेच Advanced Exam 2022 IIT Bombay द्वारे रविवारी घेतली जाणार आहे. परीक्षा दोन सत्रात होणार असून पेपर 1 ची वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 आहे, तर पेपर 2 ची परीक्षा दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेतली जाणार आहे.

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी कोण पात्र असणार

जेईई मेन 2022 अंतिम गुणवत्ता यादीमध्ये टॉप 2,50,000 रँकमध्ये समाविष्ट असलेले विद्यार्थी जेईई प्रगत परीक्षा 2022 साठी पात्र असणार आहेत. त्याशिवाय जर दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांची रँक आणि गुण समान असतील तर 2.50 लाखांचा हा आकडा थोडा जास्त असू शकतो असंही सांगण्यात आले आहेत.