Result : ICSE दहावीचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहता येणार निकाल..!

| Updated on: Jul 17, 2022 | 5:43 PM

यंदा आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेसाठी 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्याचा निकाल आज वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. आता आयएससी 12 वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. सीआयएससीई बोर्ड लवकरच हा निकालही जाहीर करेल. त्यामुळे बोर्डाच्या अधिकृत पेजवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Result : ICSE दहावीचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहता येणार निकाल..!
NEET PG allotment
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई :  (ICSE 10 th Result) आयसीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना हा निकाल एका क्लिकवर पाहता येणार आहे. कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात सीआयएससीई ने आयसीएसई निकाल हा रविवारी जाहीर केला आहे. यंदा (ISCE)  इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आता cise.org सीआयएससीई बोर्डाच्या अधिकृ (Website) वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. याकरिता केवळ विद्यार्थ्यांना रोल नंबरची आवश्यकता असणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये शिवाय लवकर निकाल पाहता यावा यासाठी ही सोय बोर्डाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

cisce.org
results.cisce.org
results.nic.in या तिन्हीही वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाला पाहता येणार आहे.

निकाल पाहण्याची अशी आहे प्रक्रिया

1. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना cisce.org. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

2. या साईटच्या होम पेजवर ‘आयसीएसई रिझल्ट 2022’ असे ऑप्शन असणार आहे. यावर क्लिक करावे लागणार आहे.

3. आता इंडेक्स आयडी, यूआयडी नंबर आणि कॅप्चा कोड सारखे लॉगिन क्रेडेन्शियल्स भरावे लागणार आहेत.

4. यानंतर तुमचा ‘आयसीएसई दहावीचा निकाल 2022’ स्क्रीनवर दिसेल.

5. हा निकाल तापसून तुम्हाला डाऊनलोड करुन घ्यावा लागणार आहे.

6. विद्यार्थ्यांना निकालाची डिजिटल मार्कशीट डाऊनलोड करून प्रिंटआऊट घेता येईल.

‘एसएमएस’द्वारेही मिळणार निकाल

1. याकरिता सर्व प्रथम तुमच्या मोबाइल मेसेज बॉक्समध्ये जा.

2. क्रिएट मेसेजमध्ये आयसीएसई स्पेस देऊन तुमचा युनिक आयडी टाइप करावा लागणार आहे.

3. हा टाईप केलेला मेसेज 09248082883 क्रमांकावर पाठवावा लागणार आहे.

4. थोड्यावेळाने त्याच नंबरहून तुम्हाला निकाल येणार आहे.

70 हजार विद्यार्थांनी दिली परीक्षा