IGNOU Admission 2021:नवी दिल्ली: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं जुलैमधील शैक्षणिक प्रवेशासाठी प्रवेशाच्या तारखेत वाढ केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 15 जून 2021 पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. इग्नूच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर ignou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. (IGNOU extend dates for Admission 2021 July Session Registration Window Open Apply Here)
इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठाने (इग्नू) अनेकदा प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवलेली आहे. त्यानंतर पुन्हा ही तारीख वाढवून आता 15 जुलै करण्यात आली आहे. जुलै सत्रासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं यासोबत टीईई जून 2021 साठी असाईनमेंटची मुदत वाढवण्यात आली आहे. आता असाईनमेंट जमा करण्याची अंतिम तारीख 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, यूजी, पीजी, डिप्लोमा आणि इतर कोर्सेससाठी नोंदणी करण्यासाठी आता 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
The Re-registration for July 2021 cycle has been opened on the Samarth Portal https://t.co/pp84DxIGlt.
The last date for receiving RR forms is 15th June 2021.
— IGNOU (@OfficialIGNOU) May 5, 2021
स्टेप 1: इग्नूच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वात आधी ignou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.
स्टेप 2: त्यानंतर होमपेजवर जाऊन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: होमपेज उघडेल. त्यात तुम्हाला तुमची डिटेल्स भरावी लागेल.
स्टेप 4:संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचं अकाऊंट लॉगइन होणार. या लॉगइन आयडीद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता.
शुल्कही ऑनलाईन भरावे लागणार
शेवटी तुम्हाला नोंदणी शुल्क भरण्याचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन शुल्क भरल्यानंतर तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. भविष्यात कोणतीही अडचण होऊ नये म्हणून तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं जून 2021 टर्म एंड एक्झाम परीक्षेसाठी असाईनमेंट जमा करण्याची मुदत वाढवली आहे.विद्यापीठानं जारी केलेल्या निवेदनानुसार असाईनमेंट जमा करण्याची अखेरची तारीख 15 जून आहे. असाईनमेंट संदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्यावी.
संबंधित बातम्या:
नागपूर ग्रामीणमधील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेंचा निर्णय
आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्याचा निर्णय घाईगर्दीत, खासदार हिना गावित यांचा आरोप
(IGNOU extend dates for Admission 2021 July Session Registration Window Open Apply Here)