नवी दिल्ली: GATE 2021 परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईकडून जारी करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी GATE परीक्षेसाठी अर्ज केला असेल त्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. GATE2021 परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी www.gate.iitb.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. (IIT Bombay released GATE2021 Admit Card)
GATE 2021 परीक्षा पुढील महिन्यात होणार आहे. GATE म्हणजेच ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरींग 2021 परीक्षा अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्याशाखांमधील प्रवेशांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. विद्यार्थ्यांना आयआयटी, मुंबईच्या वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर परीक्षेसंबंधी सूचना उपलब्ध होतील.
इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहती, खरगपूर, कानपूर, मद्रास, रुरकी यांच्याकडून दरवर्षी रोटेशन पद्धतीनं परीक्षेचे आयोजन करण्यात येते. GATE 2021 ची परीक्षा आयआयटी मुंबईकडून घेतली जात आहे. यंदाची गेट परिक्षा 27 विषयांमध्ये घेतली जाणार आहे. गेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यातील 5,6,7,12,13 आणि 14 तारखेला होणार आहे.
1.GATE 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी gate.iitb.ac.in या वेबसाईटला भेट द्या
2. GATE Admit Card 2021 या लिंकवर क्लिक करा
3. यानंतर पुढील टॅब वर नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागेल
4. यानंर अॅडमिट कार्ड दिसेल.
5. अॅडमिट कार्डमधील माहिती चेक करुन डाऊनलोड करा
6. पुढील काळातील माहितीसाठी अॅडमिट कार्डची प्रिंट काढून सोबत ठेवा.
GATE परीक्षेचा निकाल 22 मार्च 2021 ला जाहीर होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुले गेट परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले जाऊ शकता. GATE परीक्षेच्या अधिक माहितीसाठी सातत्यानं IIT GATE च्या वेबसाईटला भेट द्या.
JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आयआयटी खरगपूरतर्फे 3 जुलै रोजी घेण्यात येईल. या परीक्षेसाठी लागणारी 75 टक्केची अट रद्द कऱण्यात आल आहे. केंद्र सरकारनं JEE Main 2020 परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्या पण कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना JEEAdvanced2021 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे.
JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख ठरली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणाhttps://t.co/kJGB2YuRXP#JEE |#JEEAdvanced2021| #rameshpokhriyal| #jeemains
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2021
CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
(IIT Bombay released GATE2021 Admit Card)