IIT Bombay Campus Placements : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ची कॉलेजेस ही देशातील सर्वोत्तम इंजीनिअरिंग कॉलेजेस मानली जातात. त्यामुळे तेथे प्रवेश मिळणे देखील मोठी गोष्ट आहे. आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना जेईई किंवा कॉलेजद्वारे आयोजित कोणत्याही पात्रता परीक्षेला बसावे लागते. या कॉलेजमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर नोकरी मिळते. अलीकडेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT बॉम्बे) च्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे 1 कोटी रुपयांचे पॅकेज मिळवले आहे, तर 63 जणांना आंतरराष्ट्रीय ऑफर्स मिळाल्या आहेत.
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 85 विद्यार्थ्यांना मिळाले 1 कोटींचं पॅकेज
रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ही मुलाखत अथवा हे इंटव्ह्यू हे ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आले. 1 ते 20 डिसेंबरदरम्यान ही प्रक्रिया पार पडली. यात 388 देशी-विदेशी कंपन्यांनी हजेरी लावली. यात प्री- प्लेसमेंट ऑफरचाही (पीपीओ) समावेश आहे. त्यामध्ये 85 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये नोकरी मिळाली आहे. आणि असे 63 विद्यार्थी आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळाले आहे. ॲक्सेंचर, एअरबस, एअर इंडिया, ॲप्पल, आर्थर डी. लिटिल, बजाज, बार्कलेज, कोहेसिटी, दा विंची, डीएचएल, फुलर्टन, फ्यूचर फर्स्ट, गूगल या टॉप रिक्रूटर्सचा कॅम्पस प्लेसमेंट समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे.
कँपस प्लेसमेंटमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश
त्याशिवाय इतर कंपन्यांमध्ये होंडा आर अँड डी, आयसीआयसीआय-लोम्बार्ड, आयडियाफोर्ज, आयएमसी ट्रेडिंग, इंटेल, जग्वार लँड रोव्हर, जेपी मॉर्गन चेस, जेएसडब्ल्यू, कोटक सिक्युरिटीज, मार्श मॅक्लेनन, महिंद्रा ग्रुप, मायक्रोन, मायक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टेनली, मर्सिडीज-बेंझ, एल अँड टी, एनके, ओला क्वालकॉम, रिलायन्स ग्रुप, सॅमसंग, शलम्बरगर, स्ट्रँड लाइफ सायंसेज, टाटा ग्रुप, टेक्सास इंस्ट्रूमेंट्स, टीव्हीएस ग्रुप यांचाही समावेश होता.
या क्षेत्रात सर्वाधिक प्लेसमेंट्स
इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञान, आयटी/सॉफ्टवेअर, फायनान्स/बँकिंग/फिनटेक, मॅनेजमेंट कन्सल्टिंग, डेटा सायन्स अँड अॅनालिटिक्स, रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन या क्षेत्रात जास्तीत जास्त प्लेसमेंट्स झाल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील बऱ्याच भागांसह 63 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांसाठी निवड करण्यात आल्याचे संस्थेनम्हतर्फे नमूद करण्यात आले. या प्लेसमेंट सेलमध्ये असे 85 विद्यार्थी आहेत, ज्यांना 1 कोटी रुपयांच्या पॅकेजवर नोकरी मिळाली आहे.