नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ महत्वपूर्ण मानला जातो. भारतीय राजकारणातील महिला नेतृत्वाच्या यादीत इंदिरा गांधींचे नाव अग्रस्थानी येते. भारताची चांद्र मोहीम, अणुबॉम्ब चाचणी, ऑपरेशनल ब्लू स्टार, बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि आणीबाणी या आणि इतर महत्त्वाच्या कामांमुळं देशातल्या जनतेमध्ये इंदिरा गांधी यांच्याविषयी चर्चा सुरु असते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या कन्या होत्या. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. 19 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांची 104 वी जयंती साजरी होत आहे.
इंदिरा गांधींना राजकारणाचा वारसा लाभला होता. पंडित जवाहरलाल नेहरु यांचं नाव त्यांना मोठं करायचं होतं. इंदिरा गांधी यांनी वयाच्या 21 व्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्ष सत्तेत होता काळ होता. इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर त्या पूर्णपणे सक्रिय झाल्या. 1959 मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आल्या. 1966 मध्ये त्या पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या आणि सलग तीन वेळा त्या पदावर राहिल्या.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्र सरकारनं खासगी बँकांना कृषी आणि पायाभूत क्षेत्राला वित्त पुरवठा करण्याचं आवाहन केलं होतं. स्वातंत्र्यानंतर जवळपास 22 वर्ष खासगी बँका कृषी क्षेत्राला मुबलक प्रमाणात कर्ज पुरवठा करत नव्हत्या. खासगी बँका देशाच्या प्रगतीत सहकार्य करत नाहीत ही भावना वाढीस लागली होती. 19 जुलै 1969 रोजी सांयकाळी 8.30 वाजता देशाला संबोधित करुन 14 खासगी बँकांचं राष्ट्रियीकरण केल्याचं जाहीर केलं. राष्ट्रीयीकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात गेला, कोर्टानं निर्णयाला स्थगिती दिली, इंदिरा गांधी यांनी अध्यादेश जारी करुन कोर्टाचा निर्णय बदलला होता. 1980 मध्ये त्यांनी आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं.
1972 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात इंदिरा गांधी यांनी कणखर भूमिका घेत पाकिस्तानचा पराभव करत बांग्लादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. 1975 मध्ये लागू केलेल्या आणीबाणीवरुन इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्यात येते. इंदिरा गांधी यांच्यावर 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांचं निधन झालं.
इतर बातम्या:
निलंबनाच्या भीतीनं ST कर्मचाऱ्याकडून विष प्राशन, बुलडाण्याच्या विशाल अंबलकर यांचं अकोल्यात निधन
Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती
झूठ बोले कौआ काटे, भाजपच्या काळात दंगली झाल्याच नाहीत, अनिल बोंडे खोटं बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप