success story | आयपीएस अंशिका वर्मा, आधी इंजिनिअरींग केले नंतर दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी झाल्या उत्तीर्ण

| Updated on: Sep 23, 2023 | 4:32 PM

अंशिका वर्मा यांनी आधी बी.टेक पूर्ण केले त्यानंतर युपीएससी परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण करीत आयपीएस अधिकारी बनल्या आहेत. कोणताही क्लास न लावता त्यांनी युपीएससीचा अभ्यास केला.

success story | आयपीएस अंशिका वर्मा, आधी इंजिनिअरींग केले नंतर दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी झाल्या उत्तीर्ण
IPS ANSHIKA
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : युपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक जणांना ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होता येत नाही इतकी ती अवघड असते. युपीएसएसी परीक्षा पास झाल्यानंतर गुणांनूसार तुमची आयएएस, आयपीएस आणि आयएफएस करीता निवड केली जाते. आज आपण अंशिका वर्मा यांची प्रेरणादायी कहाणी वाचणार आहोत. ज्या इंजिनिअरींगला होत्या. त्यांनी इंजिनिअरिंग अर्धवट सोडून युपीएसएसी परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. आज त्या आयपीएस ऑफिसर आहेत.

आयपीएस अंशिका या उत्तर प्रदेश कॅडरच्या 2021 च्या बॅंचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सध्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथे त्या एसीपी म्हणून ड्यूटी बजावत आहेत. आयपीएस अंशिका यांनी कोणताही क्लास न लावता साल 2020 युपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली. युपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांचा ऑल इंडीया रॅंक ( AIR ) 136 आला. अंशिका उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असून त्यांचे शिक्षण प्रयागराज येथे झालेले आहे. त्यांनी युपीतूनच युपीएससी सिव्हील सर्व्हीस एक्झामसाठी तयारी केली होती. नोएडा येथील शाळेतून अंशिका याचे एलिमेंटरी शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी नोएडा येथील गलगोटीया कॉलेज ऑफ इंजिनिअरींग एण्ड टेक्नॉलॉजीमधून साल 2014 ते 2018 दरम्यान त्यांनी इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन या विषयात बी.टेक डीग्री मिळविली.

क्लास न लावता अभ्यास केला

अंशिका वर्मा यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथून युपीएससीची तयारी सुरु केली. त्यांनी कोणताही क्लास न लावता युपीएससीची जोमाने तयारी केली. आणि दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण होत देशात 136 वा क्रमांक मिळविला. अंशिका यांचे वडील उत्तर प्रदेश इलेक्ट्रीसिटी कॉर्पोरेशन लिमिटेडमधून निवृत्त झाले आहेत. त्यांची आई हाऊसवाईफ होती. अंशिका सोशल मिडीयावर अधून मधून सक्रीय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 244K फॉलोओव्हर आहेत. त्या आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल पोस्ट शेअर करीत असतात.