JEE Main March Final Answer Key| जेईई मुख्य परीक्षा मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका जाहीर, निकाल लवकरच जाहीर होणार

| Updated on: Mar 24, 2021 | 12:53 PM

जेईई मेन परीक्षा मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका (JEE Main March Session Final Exam Answer Key released) जाहीर झाली आहे.

JEE Main March Final Answer Key| जेईई मुख्य परीक्षा मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका जाहीर, निकाल लवकरच जाहीर होणार
जेईई मेन मार्च उत्तरतालिका जाहीर
Follow us on

JEE Main 2021 Exam Final Answer Key नवी दिल्ली: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन परीक्षा मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका (JEE Main March Session Exam Final Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन (JEE Main 2021) मार्च 2021 सत्राची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्चला झाली होती. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन अंतिम उत्तरतालिका पाहू शकतात. (National Testing Agency has released the Final answer key for JEE Main March 2021 on its official website result expected soon)

उत्तरतालिका कुठे पाहणार?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटला बेट देऊ शकतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले गेले.

आक्षेप घेण्याची संधी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मार्च 2021 सत्राची उत्तरतालिका दोन दिवसांपूर्वी (JEE Main March Session) जाहीर केली होती. विद्यार्थ्यांना आक्षेप आक्षेप नोंदवण्यास मुदत दिली होती.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन मार्च 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.

 

संबंधित बातम्या:

जेईई मेन्स 2021 : यंदा चारवेळा परीक्षा, पहिलं सत्र फेब्रुवारीत

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

JEE Main 2021 मार्च सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप घेण्याची संधी

(National Testing Agency has released the Final answer key for JEE Main March 2021 on its official website result expected soon)