JEE Main 2021 March Result नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन मार्च परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मार्च सत्रात 13 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए मिळवले आहेत. या 13 विद्यार्थ्यांमध्ये 2 मुलींचा समावेश आहे. यामध्ये दिल्लीची काव्या चोप्रा (Kavya Chopra) आणि महाराष्ट्राची गार्गी मकरंद बक्षी (Bakshi Gargi Makarand) यांचा समावेश आहे. (JEE Main March 2021 result Kavya Chopra and Gargi Bakshi came in toppers list)
काव्या चोप्रानं केवळं 100 एनटीए गुण मिळवले नाहीत तर जेईई मेन 2021 परीक्षेत 300 पैकी गुण मिळवले आहेत. काव्या चोप्रानं फेब्रुवारीमध्ये देखील जेईई मेन परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिला 99.9 परसेंटाइल मिळाले होते. काव्या IIT प्रवेश परीक्षा – JEE Advanced 2021 ची तयारी करत आहे. काव्याला फेब्रुवारी महिन्यातील परीक्षेत 99.9 परसेंटाइल गुणांवर जेईई अॅडवान्स परीक्षेत यश मिळवलं असतं पण त्यावर ती समाधानी नव्हती, असं तिनं सांगितलं आहे. काव्याला आईआईटी-दिल्ली आणि आईआईटी-बॉम्बेमध्ये कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे. 13 टॉपर्स मध्ये दिल्ली NCTमधील 2, तेलंगाना 3, राजस्थानातील 2 , महाराष्ट्रातील 2 , बिहारमधील 1, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. जेईई मेन परीक्षा 16 मार्च ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली. एकूण 6,19,368 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
विद्यार्थ्याचं नाव | राज्य |
---|---|
काव्या चोप्रा | दिल्ली |
सिद्धार्थ कालरा | दिल्ली |
बन्नूरु रोहित कुमार रेड्डी | तेलंगाणा |
मदुर आदर्श रेड्डी | तेलंगाणा |
जोसयुला वेंकट आदित्य | तेलंगाणा |
ब्रतिन मंडल | पश्चिम बंगाल |
कुमार सत्यदर्शी | बिहार |
मृदुल अग्रवाल | राजस्थान |
जेनिथ मल्होत्रा | राजस्थान |
रोहित किमार | राजस्थान |
आश्विन अब्राहम | तामिळनाडू |
अथर्व अभिजीत तंबत | महाराष्ट्र |
गार्गी मकरंद बक्षी | महाराष्ट्र |
स्टेप 1: विद्यार्थ्यांनी निकाल तपासण्यासाठी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या जेईई मेन मार्चच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉग इन करा.
स्टेप 4: आपला निकाल स्क्रिनवर दिसून येईल.
स्टेप 5: निकाल तपासा आणि त्याची प्रिंट घ्या.
आरएसएसला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही; राहुल गांधींनी दिलं ‘हे’ कारण!https://t.co/w6UYTz3sM3#rss | #sanghparivar | #congress | #RahulGandhi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
संबंधित बातम्या:
JEE Main 2021 March Result:जेईई मेन मार्च सत्रात महाराष्ट्रातील दोघांचा डंका, 100 एनटीए गुणांची कमाई
(JEE Main March 2021 result Kavya Chopra and Gargi Bakshi came in toppers list)