JEE Main 2021 Exam Result Declared नवी दिल्ली: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन परीक्षा मार्च (Jee Main March 2021 Result declared)सत्राचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला आहे. या परीक्षेत 13 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए स्कोर मिळवला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जेईई मेन (JEE Main 2021) मार्च 2021 सत्राची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्चला झाली होती. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. पुढील सत्रातील परीक्षा एप्रिल 2021 मध्ये होणार आहे. (JEE Main March Result 2021 declared check at jee main nta nic in direct link for NTA read here toppers list)
विद्यार्थ्याचं नाव | राज्य |
---|---|
काव्या चोप्रा | दिल्ली |
सिद्धार्थ कालरा | दिल्ली |
बन्नूरु रोहित कुमार रेड्डी | तेलंगाणा |
मदुर आदर्श रेड्डी | तेलंगाणा |
जोसयुला वेंकट आदित्य | तेलंगाणा |
ब्रतिन मंडल | पश्चिम बंगाल |
कुमार सत्यदर्शी | बिहार |
मृदुल अग्रवाल | राजस्थान |
जेनिथ मल्होत्रा | राजस्थान |
रोहित किमार | राजस्थान |
आश्विन अब्राहम | तामिळनाडू |
अथर्व अभिजीत तंबत | महाराष्ट्र |
गार्गी मकरंद बक्षी | महाराष्ट्र |
स्टेप 1: विद्यार्थ्यांनी निकाल तपासण्यासाठी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या जेईई मेन मार्चच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉग इन करा.
स्टेप 4: आपला निकाल स्क्रिनवर दिसून येईल.
स्टेप 5: निकाल तपासा आणि त्याची प्रिंट घ्या.
जेईई मेन मार्चची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्च रोजी घेण्यात आली होती. ही दुसऱ्या सत्राची परीक्षा होती. यानंतर आता तिसर्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये आणि चौथ्या सत्राची परीक्षा मे मध्ये होणार आहे. प्रथमच, जेईई मेन परीक्षा एका वर्षात चार वेळा घेण्यात येत आहे. ही परीक्षा प्रथमच 13 भाषांमध्ये घेण्यात आली. यात आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती आदि भाषांचा समावेश आहे.
इयत्ता दहावी- बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोविडची लस द्या; शिवसेनेची लोकसभेत मागणीhttps://t.co/nj7EoON7k7#rahulshewale | #shivsena | #mumbai | #LokSabha | #COVID19
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
संबंधित बातम्या:
(JEE Main March Result 2021 declared check at jee main nta nic in direct link for NTA read here toppers list)