केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौसेना अकादमी (NA) यांच्या प्रवेशासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाते. सध्या आयोगाद्वारे NDA/NA II 2022साठी निवड प्रक्रिया सुरू असून यासाठीची लेखी परीक्षा 4 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रं जारी करण्यात आली असून युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार ते डाऊनलोड करू शकतात. NDA/NA II 2022द्वारे 351 पुरूष आणि 19 महिला उमेदवारांची एनडीएसाठी (NDA) तर 30 पुरूष उमेदवारांची एनएसाठी (NA)निवड केली जाते. या परीक्षेसंदर्भातील अपडेट्स (Exam updates) मिळवण्यासाठी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे. जर तुम्हीही NDA/NA परीक्षेसाठी तयारी करत असाल तर उरलेल्या वेळात परीक्षेच्या पूर्ण तयारीसाठी तुम्ही ‘सफलता’ची मदत घेऊ शकता. उमेदवार सफलताच्या NDA (2) 2022 Complete Batchच्या मदतीने घरी राहूनच चांगली तयारी करू शकतात आणि या परीक्षेत यश मिळवू शकतात.
4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या NDA/NA II 2022च्या लेखी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना काही विशेष नियम लक्षात ठेवावे लागतील. या परीक्षेदरम्यान उत्तरं लिहिताना केवळ काळ्या पेनाचाच वापर करावा. तसेच या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही होणार असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या एकूण गुणांपैकी 0.33 गुण वजा केले जातील.
NDA/NA II 2022च्या लेखी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेत यश मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षात भरती झालेल्यांपेक्षा अधिक गुण मिळवावे लागतील. खरंतर NDA/NA II 2021 साली परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत कमीत कमी 355 गुण मिळवणे आवश्यक होते. तर NDA/NA I 2021च्या लेखी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांना 343 गुण मिळवावे लागले होते. मात्र आता या परीक्षेतील स्पर्धा वाढल्याने कटऑफही थोडा वाढला आहे. NDA/NA II 2022च्या लेखी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांना 360 ते 370 या दरम्यान गुण मिळवावे लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जर तुम्हीही सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल आणि त्यासाठी वर्षानुवर्ष तयारी करत असूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर एकदा सफलता डॉट कॉमचे कोर्स जॉइन करून पहा. सफलताद्वारे सध्या UP Lehkpal, PET, IBPS, CUET, NDA, SSC आणि रेल्वे यासह विविध भरती परीक्षांसाठी बॅच आणि फ्री कोर्सेस सुरू आहेत. या कोर्सेसमध्ये दिल्लीतील तज्ज्ञ उमेदवारांकडून परीक्षेची तयारी करून घेतात. या कोर्सेसद्वारा तुम्हीही घरी राहून कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करू शकता आणि सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.