परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची (Abroad studies) संख्या झपाट्याने वाढतेय. यासाठीत ब्रिटन आणि अमेरिकेपाठोपाठ युरोपातले अनेक देश (European Countries) अश्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना जाहीर करतायत. अश्यावेळी नक्की कोणत्या देशातलं नक्की कोणती युनिव्हर्सिटी निवडावी याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये (Students & Parents) प्रचंड संभ्रम असतो. तोच दूर करण्यासाठी मुंबईच्या एमिटी युनिव्हर्सिटीत “ग्लोबल ट्यूटलेज” ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अमेरीका, ऑस्ट्रेलियातल्या भारतीय आणि परदेशी मार्गदर्शकांनी स्टडी अब्रॉड अर्थात परदेशात शिकण्यासाठी काय करायला हवं याची माहिती दिली. मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये स्टीडी अब्रॉड काऊंसिलींग एजन्सीची संख्या वाढतेय. या एजन्सींचं परदेशातल्या युनिव्हर्सिटीशी साटंलोटं असतं. यातून योग्य देश किंवा योग्य युनिव्हर्सिटी न मिळणं अशा तक्रारी वाढल्यात. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वत:च हा संबंधित देश किंवा युनिव्हर्सिटी कशी शोधावी याचं मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आलं.
डॉ. रविशंकर पलानीवेलू, असोशिएट प्रोफेसर, युनिव्हर्सिटी ऑफ एरीझोना, अमेरिका, यांच्या मते विद्यार्थ्यांनी परदेशात जाण्याचा विचार करण्यापूर्वी आपल्याला नक्की काय शिकायचंय, त्याला भविष्यात किती मागणी असेल याचा विचार करावा. हा विचार पक्का झाला शोधमोहिम सोपी होते. युनिव्हर्सिटींच्या मोठ्या नावाला भुलता कामा नये. तर त्या युनिव्हर्सिटीत आपल्या करीयरमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेला कोर्स योग्य शिकवला जातो का याची माहिती काढावी आणि त्यानूसार निवड करावी.
सध्या ग्लोबल युनिव्हर्सिटी रँकींगचे वेगवेगळे रिपोट येत असतात. क्वाक्लारॅली सिमंड्स (Quacquarelli Symonds) ही कंपनी ग्लोबल युनिव्हर्सिटी रँकींग जारी करते. जागतिक युनिव्हसिटीबाबत हे रँकींग महत्त्वाचं मानलं जातं. आता प्रत्येक पब्लिशिंग हाऊसेसने आपआपली रँकींग सिस्टम सुरु केली जाते. अनेकदा ते फसवे असतात. यामुळं योग्य कॉलेज निवडण्याचं शिवधनुष्य विद्यार्थ्यांना पेलावं लागतं. इथं थोडा अभ्यास करणं गरजेचं असतं. जे कॉलेज निवडायचं आहे त्याच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या कोर्सच्या माहिती सोबतच तिथं शिकवणाऱ्या फॅकल्टीची माहिती ही गुगल करावी असं पलानीवेलू यांनी सांगितलं. यातून आपलं शिक्षण नक्की योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे ना याची खात्री विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करता येऊ शकते.
कॉलेज शोधण्याची प्रक्रिया सात ते आठ महिन्यांची असू शकते. यासाठी कॉलेजचे सहा ते सात पर्याय शोधून ठेवणं आवश्यक असतं. या प्रत्येक ठिकाणी एडमिशन फी भरावी लागते. ती सहाजिकच भारतीयांच्या मानाने जास्त असते. अश्यावेळी थेट तिथल्या एडमिशन डिपार्टमेन्टला इमेल केल्यास ती फी एकतर कमी किंवा मोफत अर्ज भरता येऊ शकतो.
कॉलेजची निवड झाल्यानंतर तिथं अर्ज करण्याची प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी स्टेटमेन्ट ऑफ पर्पज (Statement of Purpose – एसओपी) म्हणजे संबंधित कोर्स करण्यामागची आपली भूमिका लिहून द्यावी लागते. एसओपी फार महत्त्वाचा असतो. यातून विद्यार्थ्याला अभ्यास करु इच्छिणाऱ्या विषयाची किती माहिती आहे याचा अंदाज त्या युनिव्हर्सिटीला येतो. ही निवडीची पहिली पायरी आहे. ही पार झाली की लेटर ऑफ रेकमंडेशन (Letter of Recommendation) अर्थात तिथं जाण्यासाठी विषयाशी संबंधीत तज्ज्ञांकडून शिफारस पत्र मिळवणे. कमीत कमी तीन लेटर ऑफ रेकमेंडेशन लागतात. बहुतांश पोस्ट ग्रॅज्यएशन आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी या एलओआरची गरज जास्त असते. हे पत्र देताना त्या व्यक्तीनं विद्यार्थ्यांच्या संबंधित विषयांतल्या अभ्यासाचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं असते. अमेरीका आणि युरोपातल्या युनिव्हर्सिटीत या रेकमंडेशन लेटर्सवरच प्रवेश दिले देतात. हे सर्व करताना एडमिशनची डेडलाईन पाळणं फार महत्त्वाचे.
कोर्सची फी आणि तिथं राहण्याचा खर्च याची आकडेमोड आधीच करावी लागते. कोर्स किती वर्षांचा आहे. युनिव्हर्सिटीत राहण्याची सोय आहे की बाहेर करावी लागणार याचा अंदाज घ्यावा लागतो. त्याची आर्थिक तरतूद केल्यास त्रास होत नाही. अमेरीका आणि युरोपात फेलोशीप मिळते. ती प्रत्येकाला मिळेलच याची शास्वती नसते. त्यासाठी एकॅडमीक रेकॉर्ड चांगला असावा लागतो. तो नसल्यास मग कोर्स आणि राहण्याची सोय स्वताच पाहावी लागते. ती लाखोंमध्ये असू शकते.
एकदा का युनिव्हसिटीनं एडमिशन ऑफर दिली की व्हिसासाठी अर्ज़ द्यावा लागतो. अमेरीकेत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एफ(F) आणि एम (M) असे दोन व्हिजा दिले जातात. यापैकी एम व्हिजा होकेशनल कोर्सेस आणि नॉन अकॅडेमिक अभ्यासक्रमांसाठी असतो. नियमित कोर्ससाठी एफ व्हिजा देण्यात येतो. या शिवाय जे (J) व्हिसा ही मिळू शकतो. हा व्हिजा स्टुडेंट एक्सचेंज कार्यक्रमानंतर्गत देण्यात येतो. व्हिजा मिळाल्यावर तुमचा अमेरिका किंवा मग युरोपात जाण्याचा मार्ग मोकळा होता.
परदेशात पोचल्यावर सर्व काही ठरल्याप्रमाणे होत असं नाही. एक तर तिथलं सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वातावरण वेगळं आहें. काही मुलं ते पाहूनच हबकून जातात. त्याच्याशी जुळवून घेण्याची तयारी ठेवावी. जेणेकरुन जेव्हढे वर्षे आपण त्या देशात राहणार आहोत तेव्हढे दिवस आनंदानं राहता येतील.
दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, झाल्या तर कशा; सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला!
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठी गूड न्यूज, सवलतीचे गुण कुणाला मिळणार? वाचा
MPSC Exam : एमपीएससीने मोठी भरती काढली, किती पदांची जाहिरात निघाली? वाचा एका क्लिकवर
कोल्हापूरच्या कौशिकी जाधव हिची भरारी, ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी मिळवली 83 लाखांची शिष्यवृत्ती