मुंबई: सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे. महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार याकडं राज्यातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाचा अभ्यास करु , असं म्हटलं आहे. (Maharashta Education Minister Varsha Gaikwad said we will study decision of CBSE Board for SSC HSC Exam)
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील बोर्डाच्या परीक्षांबाबत आम्ही तज्ञांचं मत घेऊ, असं म्हटलं आहे. सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा अभ्यास करु, असं देखील त्या म्हणाल्या आहेत. दोनचं दिवसांपूर्वी राज्य सरकानं महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा 4 मे पासून सुरु होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. तर, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जे विद्यार्थी यामुळं समाधानी नसतील त्यांच्या साठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
बारावीच्या परीक्षांचं काय होणार?
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात 1 जूनला आढावा घेण्यात येईल. आढावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किमान 15 दिवासांचा कालावधी राहिल, अशा पद्धतीनं परीक्षेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.
सोनू सूदकडून विद्यार्थ्यांचं अभिनंदन
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसई बोर्ड परीक्षांबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर अभिनेता सोनू सूदनं ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अखेर हा निर्णय झाला. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, असं ट्विट केलं आहे. मात्र, सोनू सूदला विद्यार्थी आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात प्रश्न विचार आहेत.
संबंधित बातम्या:
(Maharashta Education Minister Varsha Gaikwad said we will study decision of CBSE Board for SSC HSC Exam)