मुंबई : आज सकाळपासून सगळे दहावीच्या बोर्ड (10th Result 2023) निकालाची वाट पाहत होते. शिक्षण विभागाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर (Maharashtra Board 10th Result 2023 Live at mahresult.nic.in) करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्रातून दहावीच्या परिक्षेला 15,29,096 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,34,893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी कोकण विभागाने (kokan division) बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा निकाल कमी लागला आहे. एकूण 10 हजार शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे, म्हणजेचं त्या शाळांमधील एकही विद्यार्थी नापास झालेला नाही.
यंदाच्यावर्षी 23 हजार 13 शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 6844 शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. म्हणजे त्या शाळेतील एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. त्याचबरोबर निकालात मुलींनी बाजी मारली असून 95.87 टक्के पास झाल्या आहेत. तर
एकूण 23013 शाळांपैकी 6844 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची कामिगीरी सरस ठरली आहे. मुलींचा निकाल 95.87 टक्के तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला. 92.05 टक्के मुलं पास झाली आहेत.
जाहीर झालेल्या निकालामध्ये 4,89,455 विद्यार्थ्यांना 75 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्याचे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. 526210 विद्यार्थी फर्स्ट क्लासममध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 334015 इतक्या विद्यार्थ्यांना सेंकड क्लास मिळाला आहे. 85298 इतक्या विद्यार्थ्यांना थर्ड क्लास मिळाला आहे.
एकूण विद्यार्थी : 15,29,096
उत्तीर्ण : 14,34,893
कोकण विभाग (98.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण)
नागपूर विभाग (92.5 टक्के उत्तीर्ण)
मुंबई विभागाचा निकाल : 93.66 टक्के
100 टक्के निकाल शाळा: 10,000
पुणे : 95.64
नागपूर : 92.05
औरंगाबाद : 93.23
मुंबई : 93.66
कोल्हापूर : 96.73
अमरावती : 93.22
नाशिक : 92.67
लातूर : 92.67
कोकण : 98.11