मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कोरोना परिस्थितीमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यी शिकत असलेल्या शाळा आणि महाविद्यालयातच होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. पण प्रात्यक्षिक परीक्षेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (Maharashtra Board HSC SSC Exam 2021 msbshse Guidelines 10th and 12th class students for COVID 19 affected by Education Minister Varhsa Gaikwad)
10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. तर 12 वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे यादरम्यान होईल.
दहावी आणि बारावीच्या 80 गुणांच्या पेपरसाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यानं 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 आणि 50 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना एकूण 1 तासासाठी 20 मिनिटांप्रमाणं वेळ वाढवून देण्यात येईल.
परीक्षा सुरु असताना एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणं जाणवली किंवा कोरोना संसर्ग झाला असेल. कोरोना झाल्यानं करण्यात आलेल्या लॉकडाऊ, कंन्टेनमेंट झोन, संचारबंदीमुळे परीक्षा देऊ न शकलेलेया विद्यार्थ्यांसाठीव विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यात घेण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेतली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. ही परीक्षा जिल्हा आणि तालुका केंद्रांवर घेतली जाईल.
10 वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षाऐंवजी कोरोनामुळे विशिष्ट लेखन कार्य म्हणजे असाईनमेंट द्यावे लागतील. असाईनमेंट सादर करण्यासाठी 21 मे 10 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर 12 वी साठी प्रात्याक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जून दरम्यान होईल. 12 वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर 15 दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत. असाईनमेंट किंवा प्रात्याक्षिक परीक्षा देताना विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात कुणाला कोरोना झाल्यास त्यांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.
दहावी बारावी परीक्षांचं आयोजन करणाऱ्या शाळा महाविद्यालयांना कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करण्यासंदर्भात राज्य सरकार मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे.
Hats off to our students who have braved this tough academic year. To help them, here are some concessions and guidelines for the final exams. For FAQs, referhttps://t.co/KX9sqYrmnj pic.twitter.com/BX0873EFVM
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021
(Maharashtra Board HSC SSC Exam 2021 msbshse Guidelines 10th and 12th class students for COVID 19 affected by Education Minister Varhsa Gaikwad)