पुणे: कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये अखेर आजपासून सुरु झाली आहेत. राज्यात ठिकठिकाणी महाविद्यालय सुरु होणार म्हणून उत्साहाचं वातावरण दिसून आलं. मात्र, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी सकाळी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. सकाळच्या सत्रात सुरु झालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिसून आला नाही. पुण्यात कँम्पस परिसरात विद्यार्थ्यांची वर्दळ दिसून आली नाही.
महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमावलीवरुन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याचं समोर आलं आहे. नियमावलीनुसार दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम आहे. 11 नंतर विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुण्यातील नामांकित महाविद्यालय एस.पी. कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिसून आलेला नाही. जवळपास दीड वर्षांनंतर महाविद्यालय सुरू झाली तरी विद्यार्थी उपस्थित नाहीत अशी स्थिती दिसून आली.
दीड वर्षानंतर नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणारे महाविद्यालये सुरु झालेय. विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली, त्यानंतर कॅालेज सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार प्राचार्यांना देण्यात आलाय. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. नागपुरातील धरमपेठ महाविद्यालयात गुलाबाची फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय. कॅालेजमध्ये विद्यार्थ्यांचं थर्मल स्क्रिनिंग, सॅनीटायजेशन, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातेय.
“विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन तिथल्या प्राधिकारणाशी चर्चा करुन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मोठ्या पद्धतीने लसीकरणाचे काम विद्यापीठात किंवा विद्यापीठाच्या प्रांगणात करावे. ज्या क्षेत्रात कोरोना असू शकतो, कोरोना कमी झालाय किंवा कोरोना वाढू शकतो त्या क्षेत्रातले आयुक्त, महापालिका किंवा जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणाऱ्या कोविड 19 आजाराचा स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून विद्यापीठ आणि प्राधिकरणाने पुढचे निर्णय घ्यावे, असं आम्ही जीआरमध्ये म्हटलं आहे”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
इतर बातम्या:
Maharashtra College Reopen few students are attend colleges in Pune