अकरावी प्रवेशसाठी सीईटी परीक्षा घ्यायची का? दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मत नोंदवण्याचं आवाहन

| Updated on: May 09, 2021 | 2:09 PM

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. SSC student CET exam for Class XI

अकरावी प्रवेशसाठी सीईटी परीक्षा घ्यायची का? दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मत नोंदवण्याचं आवाहन
विद्यार्थी
Follow us on

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मात्र, राज्य सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाचा अभ्यास करुन निकाल जाहीर करण्याबाबत भूमिका ठरवू असं म्हटलं होतं. याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. ही परिस्थिती असताना अकरावीचे प्रवेश कसे करायचे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उभा राहिला आहे. शिक्षण विभागाकडून विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. त्यापैकीच एक म्हणजे अकरावीसाठी प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी  घेणे होय. (Maharashtra Education Department appeal to ssc student submit online opinion for CET exam for Class XI admission)

अकरावीसाठी सीईटी कशी घेणार?

शिक्षण विभागानं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी का नको, याविषयी ऑनलाईन सूचना नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित 100 गुणांची ऑफलाईन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील 14 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा कशी घ्यायची याचं आव्हान शिक्षण विभागासमोर असणार आहे.

सीईटीबाबत तुमचं मत कुठं नोंदवणार?

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागानं सीईटी घ्यावी किंवा नको याबाबत मत नोंदवण्यासाठी एक वेबपेज सुरु केलं आहे. https://www.research.net/r/11thCETTEST ही त्याची लिंक आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. मत फक्त 10 वीच्या विद्यार्थ्यांनी नोंदवायचं आहे. ही परीक्षा बहुपर्यायी असून ओएमआर पद्धतीन उत्तर नोंदवायची आहेत. ही परीक्षा 10 वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांसाटी घेण्यात येईल. जुलै महिन्यात किंवा कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर ही परीक्षा घेण्यात येईल. यापरीक्षेतील गुणांच्या आधारवर प्रवेश देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. मात्र, जे विद्यार्थी परीक्षा देण्यास इच्छुक नसतील त्यांच्या प्रवेशाबाबत काय धोरण स्वीकारलं जाणार हे पाहावं लागणार आहे.

अकरावीसाठी सीईटी इतर अभ्यासक्रमांचं काय?

शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण येत असल्यानं अकरावीसाठीचा सीईटीचा निर्णय सोयीस्कर ठरु शकतो. मात्र, अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांबाबत काय असा देखील प्रश्न सीईटीच्या पर्यायाबाबत उपस्थित होतात.

शिक्षण विभागासमोर पर्याय काय?

अकरावीसाठी ऑफलाईन सीईटी परीक्षा घेण्यासोबत शिक्षण विभागाकडून आणखी काही पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. त्यामध्ये इयत्ता सातवी आणि ननवीच्या गुणांचा देखील विचार होण्याची शक्यता आहे. यामध्ये देखील एक अडचण असून गेल्यावर्षी नववीची परीक्षा घेण्यात आली नव्हती त्यामुळे या पर्यायबाबत संभ्रम आहे.

दहावीचा निकाल कसा लावणार?

महाराष्ट्र सरकारनं दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिलला जाहीर केला होता. तेव्हा सीबीएसई बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन निकाल जाहीर करण्याबाबत भूमिका घेऊ, असं म्हटंल होतं. सीबीएसई बोर्डानं दहावीचा निकाल कसा जाहीर करणार याविषयीची नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ निकाल कसा जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra SSC exam cancelled : दहावीची परीक्षा रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, बारावीची परीक्षा होणारच!

(Maharashtra Education Department appeal to SSC student submit online opinion for CET exam for Class XI admission)