पुणे: अकरावी प्रवेशाची दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. गुणवत्ता यादीत नाव जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांनी 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान प्रवेश घ्यावा, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलीय. अकरावी प्रवेशाची पहिली फेरी यापूर्वीचं पूर्ण झालेली आहे. अकरावी प्रवेशाची पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली होती. विद्यार्थ्यांना त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यास सांगण्यात आलं होतं.
अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. पहिल्या पर्यायाचे महाविद्यालय जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रियेची स्थिती
पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 31 ऑगस्टपासून दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. पुणे, आणि पिंपरी शहरातील 315 कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. यात 1 लाख 12 हजार 725 प्रवेश क्षमता आहे. प्रवेशासाठी आतापर्यंत 83 हजार 802 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 75 हजार 917 विद्यार्थ्यांचे भरलेले अर्ज लॉक झाले आहेत. त्यातील 75 हजार 516 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 68 हजार 925 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले. 30 हजार 815 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून 81 हजार 910 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत
मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यानं अडचणी निर्माण होत होत्या. शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसेल ते विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करु शकतात, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
अकरावीसाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीला विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केल्याची पोहोच किंवा ती उपलब्ध नसल्यास वडिलांच्या जात प्रमाणपत्राची प्रत सादर करुन प्रवेश निश्चित करु शकतात. प्रवेश निश्चित करणारे विद्यार्थ्यांना 30 दिवसांच्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो. मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून अर्ज करतील त्यांना जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक नाही.
स्टेप 1 : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.
स्टेप 2: नोंदणीवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा
स्टेप 3 : लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल
स्टेप 4 : वेबसाईटवरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करा
स्टेप 5 : तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं ना तुम्हाला स्क्रिनवर पाहायला मिळेल
इतर बातम्या:
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधणार?
GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कशी? वाचा सविस्तर
Maharashtra FYJC Admission 2021 Second Round Merit list declared today