मुंबई : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल कसा तयार केला जाणार, याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर घोषित करणार असल्याचं सांगितलं ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न. (Maharashtra SSC exam Education Minister Varsha Gaikwad FAQ on result of class 10 and admission of class 11)
प्रश्न : दहावीची परीक्षा होणार आहे का?
उत्तर : महाराष्ट्र सरकारने दहावीची परीक्षा (SSC exam 2021) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच घेतला आहे.
प्रश्न : दहावीची परीक्षा होणार नाही मग मूल्यांकन कसं होणार?
उत्तर : अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मुलांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे.
प्रश्न : दहावीच्या विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यांकन नेमकं कसं होणार?
दहावीच्या वर्षातील लेखी मूल्यमापनला 30 गुण असतील, दहावीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत 20 गुण असतील तसंच नववीच्या विषयानिहाय गुण याला 50 गुण असतील. असं एकूण 100 गुणांचं मूल्यमापन असेल
प्रश्न : म्हणजे दहावीचे सरसकट सर्व विद्यार्थी पास असतील का?
उत्तर : जर एखाद्या विद्यार्थ्याने लेखी मूल्यमापन, गृहपाठ किंवा तोंडी परीक्षा योग्यप्रकारे दिली नसेल, किंवा नववीलाही काठावर पास असेल तर त्याच्या निकालाबाबत सरसकट पास असं होणार नाही.
प्रश्न : मला मिळालेले दहावीचे गुण मान्य नसतील तर काय?
उत्तर : दहावीचे गुण मान्य नसतील तर तुम्हाला श्रेणी सुधारची संधी असेल. कोव्हिड परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्हाला परत परीक्षा देता येईल.
प्रश्न : इयत्ता अकरावीचा प्रवेश कसा होणार?
उत्तर : इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
प्रश्न : इयत्ता 11 वीसाठी CET परीक्षेतील प्रश्न कोणत्या आधारे विचारणार?
उत्तर : इयत्ता 11 वीच्या प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहे.
प्रश्न : इयत्ता 11 वीची CET परीक्षा किती गुणांची?
उत्तर : ही परीक्षा 100 गुणांची असेल. ती OMR पद्धतीने घेतली जाईल. त्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल
प्रश्न : इयत्ता अकरावीचे प्रवेश कसे होणार?
उत्तर : CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. ही परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.
प्रश्न : CET न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश कसा मिळणार?
उत्तर : CET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार होईल.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दहावी एसएससी परीक्षेसदंर्भात शासन निर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठं आव्हान निर्माण झालं होतं. ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभर सुरू होतं. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी 24 बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष
वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण
दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण
नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण
संबंधित बातम्या :
अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, जाणून घ्या सर्व प्रक्रिया
दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत जाहीर करणार, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
(Maharashtra SSC exam Education Minister Varsha Gaikwad FAQ on result of class 10 and admission of class 11)