पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं (MSCE) पाचवी आणि आठवीची 20 फेब्रुवारी रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam ) पुढं ढकलली आहे. परीक्षा परिषदेनं परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. याशिवाय अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. एमएससीईचे आयुक्त एच. आय. आतार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (Class 5 and Class 8 Scholarship Exam) ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाशी संलग्नित शाळांमधील पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज दाखल करु शकतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेदच्या वेबसाईटवर यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन करते. दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते. 2021-22 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा आयोजित करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2022 ही तारीख निश्चित केली होती. मात्र, 31 जानेवारीपर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यानं तयारीस कमी वेळ शिल्लक राहत असल्यानं परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा परिषद पाचवी आणि आठवीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित करते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात येणार आहे.
पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना www.msecpune.in आणि https://msecpuppss.in या वेबसाईटवर अर्ज करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची फी यावर्षीपासून वाढवण्यात आली आहे. नव्या शासन निर्णयाप्रमाणं बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 50 रुपये तसेच परीक्षा शुल्क 150 रुपये करण्यात आलंय. मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रवेश शुल्क 50 रुपये तर परीक्षा शुल्क 75 रुपये करण्यात आलं आहे.
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांच्या माध्यमातून 31 जानेवारीपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्यानं परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
इतर बातम्या:
Maharashtra State Council of Examination postpone Scholarship exam of 5th and 8th class extend dates for online application