पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता 23 मे रोजी होईल. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. (Maharashtra State Examination Council postpone 5th and 8th standard scholarship exam know details)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 एप्रिल दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.
शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी यापूर्वी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदत 10 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
राज्यातील 6 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. आता बदलेल्या वेळापत्रकाप्रमाणं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा 23 मे रोजी आयोजित करणार आहे.
पंढरपुरात राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी, शिवसेनेकडून जिल्हा संघटकाचीच हकालपट्टी https://t.co/OeJVMNjUeo #PandharpurBypoll #PandharpurByelection #BJP #Shivsena #NCP #BhagirathBhalke
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
संबंधित बातम्या
SSC HSC Exams 2021 : वर्षा गायकवाडांनी ठासून सांगितलं, काठिण्य पातळी गौण, आमची तयारी झालीय!
(Maharashtra State Examination Council postpone 5th and 8th standard scholarship exam know details)