नवी दिल्ली : जगातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्हिडीओ मीटमध्ये नवीन फीचर आणत आहे. मायक्रोसॉफ्टचं व्हिडीओ मीट आणि सहाय्यकारी मंचच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी एक फीचर आणत आहे. या फीचरमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणं सुकर होणार आहे. याला रीडिंग प्रोग्रेस म्हटलं जातं. यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या धड्याचा अभ्यास करण्यासाठी व्हिडीओ मीटवर रेकॉर्डिंग करण्याची परवानगी देण्यात येईल. द वर्जच्या रिपोर्टनुसार या टुलचा फायदा विद्यार्थ्यासह शिक्षकांना देखील होणार आहे.(Microsoft to help students in online classes by adding new features in video meet)
मायक्रोसॉफ्टच्या व्हिडीओ मीटद्वारे शिक्षक त्यांच्या अध्यापनाची गती, अचूकता वाढवू शकतात. मायक्रोसॉफ्ट ऑक्टोबर पासून 350 शिक्षकांच्या मदतीनं चाचणी करणार आहे. हे फीचर लवकर वापरकर्त्यांसाठी मोफत असेल.
द वर्जनं दिलेल्या माहितीनुसार शिक्षकांना मायक्रोसॉफ्ट मीटवर एक डॅशबोर्ड दिसेल यामध्ये प्रति मिनिट शब्द आणि अचूकतेचा दर दाखवेल. यामध्ये त्यांना एका शब्दासाठी एखाद्या विद्यार्थ्याचं ऐकण्याची मुभा असेल. जर शिक्षक ऑटो डिटेक्शन सुविधा सुरु करु इच्छित नसतील तर ते बंद करु शकतात. यानंतर ते एका विद्यार्थ्याच्या वाचनाचा व्हिडीओ पाहू शकतात. हे फीचर मॅन्युअल पद्धतीनं वापरता येईल.
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात मायक्रोसॉफ्टशी ऑनलाईन शिक्षणासंदर्भात मायक्रोसॉफ्टशी अनेक टीम जोडलेल्या आहेत. या टीममध्ये 145 मिलीयन दैनिक वापरकर्ते आहेत. कंपनीनं गेल्या वर्षभरात 300 सुविधा वाढवल्या आहेत. तर, आणखी 100 सुविधा वाढवण्यात येणार आहेत.
‘या’ पाच कारणांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, जाणून घ्या किंमत किती?#brentcrudeoilprice #Crudeoilprice #crudeoilpricetoday #GoldmanSachs #PetrolDieselPriceHike https://t.co/2CHX7WiLDE
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2021
संबधित बातम्या
JEE Main 2021 May Postponed : जेईई मेन मे सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश
(Microsoft to help students in online classes by adding new features in video meet)