महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 95. 81 टक्के इतका लागला असून यावर्षी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत मुलींचा निकाल 97.21 टक्के इतका लागला आहे. तर या परीक्षेतील 72 विषयांपैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला, म्हणजेच 18 विषयांमध्ये मुलांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाबद्दल सविस्तर माहिती दिली. विभागीय निकालाचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीदेखील कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला. मात्र नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागातून 99.01 टक्के विद्यार्थी तर नागपूरमधील 94.73 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलीच ठरल्या हुशार
नेहमीप्रमाणेच यंदाही १० वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के इतका लागला आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 2.65 टक्के जास्त लागला आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44%
नागपुर – 94.73%
संभाजीनगर – 95.19%
मुंबई – 95.83%
कोल्हापूर – 97.45%
अमरावती – 95.58%
नाशिक – 95.28%
लातूर – 95.27%
कोकण – 99.01%
‘या’ लिंकवर जाऊन पाहा दहावीचा निकाल, लिंक अॅक्टिव..