मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या 10 वी च्या शालान्त परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. विद्यार्थी, पालक, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्वांच दहावीच्या निकालाकडे लक्ष असतं. कारण दहावीच्या निकालावर पुढील महाविद्यालयीन प्रवास कसा होणार? कुठच्या दिशेने जाणार? ते ठरतं. आज दुपारी 1 वाजता दहावी शालान्त परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद झाली.
2 मार्च ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली. विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत करतात. मनासारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा हा त्यामागे उद्देश असतो.
किती विद्यार्थी दहावीला बसले? किती पास झाले?
यंदा महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी चा निकाल 93.83 % लागला. यंदाही निकालाक मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल 95.87 टक्के आणि मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला. 15 लाख 29 हजार 96 इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती.
कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के, कोण अव्वल, कोण तळाला जाणून घ्या.
– कोकण 98. 11%
– पुणे 95.64%
– मुंबई 93.66%
– औरंगाबाद 93.23%
– नाशिक 92.22%
– कोल्हापूर 96.73%
– अमरावती 93.22%
– लातूर 92.66%
– नागपूर 92.05%
नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल 92.49%, तर कोकण विभाग ठरला अव्वल 98.11%