…आणि मुलं इंग्रजी बोलू लागली! नाशिकच्या दुगलगावाचं रुपं शिक्षक आणि गावकऱ्यांनी पालटलं, माय इंग्लिश विलेज संकल्पना नेमकी काय?

| Updated on: Sep 20, 2021 | 11:27 AM

कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यानंतर कोरोनाची आलेली दुसरी लाट यामुळं राज्यातील शाळा बंद आहेत. महाराष्ट्र सरकारनं शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत ऑनलाईन शिक्षण सुरु केलं.

...आणि मुलं इंग्रजी बोलू लागली! नाशिकच्या दुगलगावाचं रुपं शिक्षक आणि गावकऱ्यांनी पालटलं, माय इंग्लिश विलेज संकल्पना नेमकी काय?
नाशिक येवला दुगलगाव
Follow us on

नाशिक (येवला): कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यानंतर कोरोनाची आलेली दुसरी लाट यामुळं राज्यातील शाळा बंद आहेत. महाराष्ट्र सरकारनं शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत ऑनलाईन शिक्षण सुरु केलं. ज्या गावांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध होतं नव्हती त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. राज्यातील काही गावांमधील शाळांनी केली आहे वेगवेगळ्या उपक्रमांच्या द्वारे शिक्षणाची सोय उपलब्ध केली. गावोगावी लोक सहभागातून संपूर्ण गावातील भिंतीवर इंग्लिश मराठी अक्षरांचे फलक रेखाटले असल्याचं समोर आलं होतं. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील दुगलगावामध्ये देखील या प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा फायदा असा झालाय की गावातील मुलं इंग्रजी बोलू लागली आहेत.

… आणि मुले इंग्रजी बोलू लागली

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेल्या दीड वर्षांपूर्वी देशांतर्गत लॉकडाऊन झाल्यापसून आजपर्यंत शाळा बंद आहेत. पण मुलांच्या मनातील इंग्रजी वाचनाची, बोलण्याची भिती दूर व्हावी तसेच घराघरात इंग्रजी पोहचवावी यासाठी My English Village हा अभिनव उपक्रम फायदेशीर ठरला आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील दुगलगाव येथील शिक्षक व गावातील ग्रामस्थांच्या लोक सहभागातून संपूर्ण गावतील भिंतीवर इंग्लिश मराठी अक्षरांचे फलक रेखाटले. याचा फायदा आता दिसून येत असून गावातील मुलं इंग्रजी बोलू लागली आहेत.

इंग्रजीची गोडी लावण्यासाठी गावकरी आणि शिक्षक एकत्र

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी मार्च महिन्या देशांतर्गत झाल्याने 24 मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा बंद असल्याने मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कमी झाल्याने विद्यार्थी हे शिक्षणापासून दूर गेले होते. मुलांमध्ये मराठीसह इंग्रजी वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे, या हेतूनं गावकरी आणि शिक्षक एकत्र आले. यासाठी येवला तालुक्यातील दुगलगाव येथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी संपूर्ण गावतील भिंतीवर इंग्लिश मराठी अक्षरांची फलक रेखाटले. यामुळे शाळेतील मुलांसमवेत गावातील इतर मुलांची, नागरिकांची ही इंग्रजी शब्द संपत्ती वाढविण्यासाठी हा प्रेरणादायी उपक्रम प्रत्यक्षात अंमलात आणल्याने कोरोना काळातच नव्हे तर इतरही वेळी शाळा सुरु असताना मुलांना इंग्रजी शब्द वाचनाची गोडी निर्माण झाली आहे .My English Village हा अभिनव उपक्रम नाशिक जिल्ह्यात पहिला ठरला आह, असं दुगलगाव शाळेचे मुख्याध्यापक राहुल धुमाळ यांनी सांगितलं आहे.

दुगलगाव येथे शिक्षक आणि गावातील ग्रामस्थ एकत्र येत जो हा अभिनव उपक्रम राबवला आहे, या उपक्रमामुळं गावातील मुलांना नक्कीच फायदा होईल, असं आशा लासुरे यांनी म्हटलं आहे. तर, इंग्रजीच्या ज्ञानात भर पडल्यानं यामुळे फायदा होत असल्याचे विद्यार्थी कुणाल भागवत म्हणाला आहे. येवला तालुक्यातील दुगलगाव प्रमाणे संपूर्ण राज्यात हा अभिनव उपक्रम राबविल्यास शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल.

इतर बातम्या:

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणीची अखेरची संधी, अर्ज कुठे करायचा?

icai ca inter result 2021 : आयसीएआय सीए इंटर परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल कुठं पाहायचा?

 

Nashik Yeola Dugalgoan village people and ZP School teacher started My English Village during corona time