NEET : तामिळनाडूनं नेमकं काय केलंय, नीटला विरोध का? महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांना काय वाटतं

| Updated on: Sep 16, 2021 | 11:07 AM

जी परीक्षेच्या 19 तासांपूर्वी दक्षिणेकडील प्रमुख राज्य तामिळनाडूत एका विद्यार्थ्यानं परिक्षा होण्यापूर्वी आत्महत्या केली, पुन्हा परीक्षा झाल्यानंतर एका विद्यार्थिनीनं देखील आत्महत्या केली. तामिळनाडूतील एका विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्येचे पडसाद राज्याच्या विधानसभेत तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा नको, अशी भूमिका असणारं विधेयक मांडण्यात आलं.

NEET : तामिळनाडूनं नेमकं काय केलंय, नीटला विरोध का? महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांना काय वाटतं
Student
Follow us on

लातूर: कोरोना विषाणू संसर्गामुळे लांबणीवर पडलेल्या नीट पीजी आणि यूजी परीक्षा 11 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबरला पार पडल्या. नीट यूजी परीक्षेच्या 19 तासांपूर्वी दक्षिणेकडील प्रमुख राज्य तामिळनाडूत एका विद्यार्थ्यानं परिक्षा होण्यापूर्वी आत्महत्या केली, पुन्हा परीक्षा झाल्यानंतर एका विद्यार्थिनीनं देखील आत्महत्या केली. तामिळनाडूतील एका विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्येचे पडसाद राज्याच्या विधानसभेत तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा नको, अशी भूमिका असणारं विधेयक मांडण्यात आलं. तामिळनाडूतील भाजप वगळता इतर राजकीय पक्षांना पाठिंबा देत विधेयक मंजूर केलं. तामिळनाडूमध्ये आता 12 वीच्या गुणांवर मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल. मात्र, 12 वीच्या गुणांवर खरंच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का? तामिळनाडूच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील तज्ज्ञांना काय वाटतं, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

तामिळनाडूचा नीटला विरोध जुनाच

2013 पूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देश पातळीवर ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय प्रवेशासाठीची ही परीक्षा बदलून राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. 2016 मध्ये सुप्रीम कोर्टानं नीट परीक्षेला दिलेली स्थगिती उठवली. तेव्हापासूनच नीट परीक्षेला तामिळनाडूतील राजकीय पक्ष, विद्यार्थी आणि पालकांनी विरोध केला आहे. तामिळनाडूमध्ये जय ललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाची सत्ता असताना देखील नीट परीक्षा विरोधी प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, राष्ट्रपतींची मंजुरी न मिळाल्यानं तो प्रस्ताव अंमलात आला नव्हता.

तामिळनाडू सरकारचा निर्णय खरचं अमंलात येईल

द्रमुकचे नेते स्टॅलिन यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नीट रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणं उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती, त्याच्या शिफारशीवंर विचार करुन सामाजिक न्याय, तामिळनाडूमधील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी नीट परीक्षा नको, अशी भूमिका मांडणारं विधेयक मंजूर केलं आहे. तामिळनाडू सरकारनं मंजूर केलेल्या विधेयकाचा मार्ग सोपा नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ज्यावेळी विधेयकावर स्वाक्षरी करतील त्यावेळी हा निर्णय अंमलात येईल. मात्र, राष्ट्रपतींनी विधेयक मंजूर केल्याशिवाय तामिळनाडूचा निर्णय अंमलात येणार नाही.

तामिळनाडूमधील या वर्षीचे प्रवेश कसे होणार?

तामिळनाडू सरकारनं आता विधेयक मंजूर केलं असलं तरी यंदाचे प्रवेश हे नीट प्रमाणेच होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यास पुढील वर्षापासून 12 वीच्या गुणावर तामिळनाडूतील वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश होतील. तामिळनाडू सरकारनं राज्यातील विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या गुणांवर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठीचं विधेयक मंजूर केलं असलं तरी तामिळनाडूमधील विद्यार्थी इतर राज्यात शिक्षण घ्यायचं असल्यासं त्या विद्यार्थ्यांसाठी काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

नीटच्या तयारीसाठीचा आर्थिक खर्च अधिक

राष्ट्रीय पातळावरील प्रवेश परीक्षा जेईई, नीट परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसचा सहारा घ्यावा लागतो. कोचिंग क्लासेसची फी देखील अवाढव्य असल्यालनं सामान्य आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसची फी परवडेल का? प्रश्न अनुत्तरीतचं राहतो. तामिळनाडू राज्य सरकार त्यांच्या निर्णयाचं समर्थन करताना कोचिंग क्लासेस साठी लागणाऱ्या खर्चाचा मुद्दा देखील मांडतं.

तामिळनाडूच्या निर्णयाबद्दल तज्ज्ञांना काय वाटतं?

तामिळनाडू सरकारने नीट परीक्षा रद्द केल्याने राज्यातल्या शिक्षण वर्तुळात या निर्णया बद्दल उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. नीट परीक्षेचे गुण लक्षात न घेता थेट बारावीच्या टक्केवारीवरच वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार असल्याचे तामिळनाडू सरकारने स्पष्ट केले आहे. आपल्या राज्यातल्या शिक्षण तज्ञांना मात्र तामिळनाडू सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे असं वाटतंय.

नीट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांचा शोध लावला जातो. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षेच्याही बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण परीक्षा असली पाहिजे असं तज्ञांच मत आहे . विद्यार्थ्यांनी तयारी करून नीटची परीक्षा दिली आहे ,ज्यांच्या मध्ये गुणवत्ता आहे ,ती समोर येतेच त्यामुळे दोन्ही परीक्षांना सामोरे जाणे हे अत्याधुनिक शिक्षण पद्धती आहे . त्याच स्वागत केलं गेले पाहिजे असेही काही जणांना वाटते आहे . वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देताना बारावी आणि नीट असे दोन्हीचे गुण लक्षात घ्यावे असं लातूरमधील शिक्षण तज्ञ प्रा. हेमंत वरुडकर आणि दयानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. टी. जगताप यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या:

CA Topper : सीए परीक्षेत भाऊ-बहिणीचे अव्वल यश, नंदिनी अग्रवाल 614 गुण मिळवून बनली AIR 1

देशांत शस्त्रनिर्मितीची स्पर्धा वाढली, विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची गरज : भगतसिंह कोश्यारी

NEET exam Tamilnadu Government approve bill against NEET what is their stand Maharashtra Education Members reaction on decision of Tamilnadu