मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून (Student) होत आहे. तसेच विद्यार्थी अनेक दिवसांपासून ट्विटरवर (Twitter) परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती देखीव करीत आहेत. परंतु त्यांच्या ट्विटर विनंतीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच त्यांची दखल सुध्दा घेतलेली नाही. आता विद्यार्थ्यांनी मदतीसाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्यामुळे परीक्षेच्या आगोदर काय होणार हे पाहावं लागणार आहे. परीक्षा 9 जुलैला होणार असा मेसेज विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. परंतु तो मॅसेज खरा नसून ठरलेल्या वेळेत परीक्षा होणार असल्याचे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने जाहीर केलं आहे.
21 मे रोजी होणार्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2022) पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन (AIMSA) ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत परीक्षा वेळेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा वेळेत होईल. NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना आता या PG अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी शेवटचं रिव्हिजन सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ती पुढे ढकलण्याचा ट्रेंड चालवण्यात आला होता. पण विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. 30 एप्रिलला झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित होते.
संदीप एस तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. संदीप एस तिवारी यांनी ट्विट केले आणि लिहिले, “ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने, आम्ही 21 मे 2022 रोजी होणार्या नीट पीजी 2022 परीक्षेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांनी आपला मुद्दा मांडला आहे. NEET PG 2021 साठी सुरू असलेल्या समुपदेशनासह परीक्षेच्या तारखांच्या संघर्षामुळे उमेदवारांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.