अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमाचं आयोजन येत्या 1 एप्रिलला करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानात परीक्षा पे चर्चा करण्यात येतणार आहे. यावर्षी 1 एप्रिल 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणार्या “परीक्षा पे चर्चा ” या कार्यक्रमात अकोला (Akola) जवाहर नवोदय विद्यालयाच्या 4 बालचित्रकारांची निवड झाली आहे. नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणं हे अकोला जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं बोललं जात आहे. गायञी लांडे, तेजस्विनी घोरमारे, आयुषी गजभिये आणि अनुष्का खेवले यांची निवड झाली असून त्यांच्या चित्र कृतीचे निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदीं व इतर मान्यवर करणार आहेत. नरेंद्र मोदी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ताणवरहीत परीक्षांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
अकोला जवाहर नवोदय विद्यालय येथे डिसेंबर 2021 मध्ये नवोदय विद्यालय समिती, पुणे यांच्या मार्फत कला महोत्सव आयोजित करून 21 विद्यार्थांना चित्रकला,शिल्पकला, पेपर प्रिटिंग,निसर्गचिञ,आधूनिक चित्र इत्यादी साठी “दृश्य कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यालयाच्या कलाशिक्षक श्रीमती किशोरी निकूरे व विविध कलेतील मान्यवर उपप्राचार्या श्रीमती कविता चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले.
या कार्यशाळेत तयार केलेल्या चित्र / शिल्पाची विभागीय स्तरावर निवड झाल्यानंतर आखिल भारतीय स्तरावर निवड झाली. या बालचित्रकारांना नवी दिल्ली येथे होणार्या परीक्षे पे चर्चा कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हे विद्यार्थी दिल्ली साठी रवाना झाले आहेत. यात संपूर्ण भारतातील 13 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या 13 विद्याथ्यांमध्ये 4 विद्यार्थी हे अकोल्याचे आहेत.
जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र चंदनशिव यांनी 1 एप्रिल रोजी होणारा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळं गेल्या वर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं झाला होता. या वर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
attacked on kejriwal house: अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले