शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सुशिक्षित व्यक्ती देशाला चांगले आणि मजबूत बनवण्यात योगदान देते. भारतात सरकारी शाळांमध्ये शिकणारी अनेक मुले आहेत. सरकारी शाळांमध्ये गरीब श्रीमंत असा कोणतही भेदभाव न करता सर्वानाच शिक्षण दिले जाते. याच सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी मोदी सरकारने एक विशेष योजना आणली आहे. भारतात अशा अनेक शाळा आहेत ज्या अनेक वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या आहेत. याच शाळांना आधुनिक बनवण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री श्री शाळा योजना सुरू केली आहे. श्री शाळा योजनेमधून विकसित झालेल्या शाळा इतर सामान्य शाळांपेक्षा वेगळ्या असणार आहेत.
भारत सरकारने सन 2022 मध्ये एक योजना सुरू केली होती. या योजनेचे नाव पीएम श्री म्हणजेच पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया असे होते. पीएम श्री स्कूल योजना म्हणून ही योजना ओळखली जाते. या योजनेअंतर्गतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबविण्यात येणार आहे. पीएम श्री स्कूल योजनेंतर्गत सुमारे 14500 शाळा विकसित करण्याचे काम सरकार करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शाळा बांधल्या जाणार आहेत.
पीएम श्री स्कूल योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या शाळांमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळणार आहे. या योजनेचा 20 लाख लहान मुलांना फायदा होणार आहे. 5 वर्षांच्या या प्रकल्पात केंद्र सरकारकडून 18128 कोटी रुपये दिले जाणार आहेत तर उर्वरित खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे.
सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हव्या त्या प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. कोणत्याही खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अत्याधुनिक सुविधा मिळतात. मात्र, भारत सरकारच्या पीएम श्री योजनेंतर्गत आता सरकारी शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये भौतिक पायाभूत सुविधा मजबूत केल्या जाणार आहेत. मुलांचे वर्ग. खोल्या अधिक चांगल्या पद्धतीने बनवल्या जातील. प्रत्येक शाळेत प्रयोगशाळेची व्यवस्था केली जाणार आहे. यासोबतच मुलांना विविध विषयांचे व्यावहारिक ज्ञान दिले जाणार आहे. तसेच, व्हीआर हेडसेट, बहुभाषिक पेन ट्रान्सलेटर, व्हिडीओ रेकॉर्डिंग लॅब आणि खेळासाठी चांगले कॉम्प्लेक्सही तयार केले जाणार आहेत. तर, अंध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.