प्रियांका गांधींनी सीबीएसईला फटकारलं, कोरोना रुग्ण वाढताना परीक्षा घेणं बेजबाबदारपणा असल्याचं सुनावलं

| Updated on: Apr 09, 2021 | 3:59 PM

प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन सीबीएसई बोर्डावर निशाणा साधला. Priyanka Gandhi Vadra CBSE

प्रियांका गांधींनी सीबीएसईला फटकारलं, कोरोना रुग्ण वाढताना परीक्षा घेणं बेजबाबदारपणा असल्याचं सुनावलं
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी
Follow us on

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. सध्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्याची मागणी होत आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गाधी वाड्रा यांनी सीबीएसई बोर्डावर जोरदार टीका केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर राहण्यास सांगण्याचा सीबीएसईचा निर्णय बेजबाबदारपणाचा असल्याचा आहे, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. (Priyanka Gandhi Vadra Slams CBSE said conducting exams during corona time is irresponsible)

प्रियांका गांधी यांचं ट्विट

प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन सीबीएसई बोर्डावर निशाणा साधला. सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत परीक्षा द्यायला भाग पाडणं बेजबाबदारपणाचं आहे.सध्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा परीक्षा पुढे ढकलून नवं वेळापत्रक जारी करावं, अशी मागणी प्रियांका गंधी यांनी केली. याशिवाय विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, अशा पद्धतीनं परीक्षांचं नियोजन करावं, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.

बोर्ड परीक्षा रद्द करा, 1 लाख विदयार्थ्यांची मागणी

सध्या वाढलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्या, असी मागणी केली आहे. मात्र, सीबीएसईनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कराव्यात यासाठी मागणी करण्यात येत आहे. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना 4 मेपासून सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर

CBSE Exam class 10: सामाजिक विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी अफवा, सीबीएसईकडून स्पष्टीकरण

(Priyanka Gandhi Vadra Slams CBSE said conducting exams during corona time is irresponsible)