QS World University rankings 2025 : जगातील टॉप यूनिव्हर्सिटी कोणती ? IIT मुंबईचा जगात दबदबा कायम? देशाची आणखी कोणती युनिव्हर्सिटी टॉप

| Updated on: Jun 05, 2024 | 9:34 PM

जगातील युनिव्हर्सिटीचे रॅंकींग ठरविणाऱ्या रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025  ( QS World University rankings 2025 ) या संस्थेची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर झाली आहे.

QS World University rankings 2025 : जगातील टॉप यूनिव्हर्सिटी कोणती ? IIT मुंबईचा जगात दबदबा कायम? देशाची आणखी कोणती युनिव्हर्सिटी टॉप
QS World University rankings 2025 IIT MUMBAI (1)
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जगातील टॉप युनिव्हर्सिटीची ताजा रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025  ( QS World University rankings 2025 ) जारी झाली केली आहे. यात भारतातील शैक्षणिक संस्थांनी देखील नंबर पटकावला आहे. क्युएस वर्ल्ड रॅंकींग 2025 च्या यादीत आयआयटी मुंबई आणि आयआयटी दिल्ली यांनी टॉप 150 शैक्षणिक युनिव्हर्सिटीमध्ये स्थान पटकावले आहे. दोन भारतीय शैक्षणिक संस्थांनी रॅंकींग गेल्यावर्षीपेक्षा चांगली झाली आहे. अमेरिकेतील केम्ब्रिजच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या यादीत पहिला क्रमांक आला आहे.

क्यूएस वर्ल्डच्या ताजा रॅंकींगमध्ये जागा पटकविणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्थामध्ये बंगलुरुची इंडियन इस्टिट्यूट ऑफ सायन्स ही 211 व्या क्रमांकावर आली आहे. तर आयआयटी मुंबई हीचा 118 वा क्रमांक मिळाला आहे. गेल्यावर्षी या आयआयटी मुंबईला 149 वी रॅंकींग मिळाली होती. म्हणजे यंदा आयआयटीची रॅंकींग सुधारली आहे. तर आयआयटी दिल्लीला 197 वी रॅंकींग मिळाली होती. यंदा आयआयटी मुंबईला देशातील पहिली रॅंकींग मिळाली आहे. तर आयआयटी दिल्लीला 150 वे स्थान मिळाले आहे. याशिवाय आयआयटी खडगपूरला 222 वे स्थान, तर आयआयटी मद्रासला 227 वी स्थान मिळाले आहे. आयआयटी कानपूरला 263 वे स्थान मिळाले आहे.

जेएनयूला 580 वे स्थान

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीला देखील स्थान मिळाले आहे. तसेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु ( जेएनयू ) ला 580 वे स्थान मिळाले आहे. आयआयटी रुडकीला 335 वा रॅंक तर आयआयटी गुवाहाटीला 344 वे, अण्णा युनिव्हर्सिटीला 383 वे स्थान प्राप्त झाले आहे. तर आयआयटी इंदूरला 477 वे, आयआयटी बीएचयू या संस्थेला क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 मध्ये 531 वे स्थान मिळाले आहे.