How do I write a resume for a job : डिजिटल युगात AI द्वारेच भरती प्रक्रिया राबवल्या जाते. कंपन्या एचआर, नोकरीसाठीचे अर्जांची छाटणी, त्यांचे मूल्यांकन आता AI आधारे करतात. त्यामुळे तुमचा रिझ्युमे केवळ माहितीपूर्णच नाही तर एकदम प्रभावी हवा. तो एआय एल्गोरिदमच्या मानदंडावर सुद्धा खरा उतरायला हवा. त्याआधारे तुमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होतो. तेव्हा रिझ्युमे तयार करताना नेहमीचीच चूक करू नका. तुमचा रिझ्युमे हा जणू तुमचा दूतच असतो. या रिझ्युमे जितका प्रभावी आणि अचूक असेल तितकी तुमची नोकरी मिळण्याची संधी वाढते. आता AI चं युग आहे, कसा हवा तुमचा रिझ्युमे?
1. साधा फॉर्मेट
एआयच्या मदतीने साधा आणि स्पष्ट रिझ्युमे लवकर ओळखता येतो. डिझाईन सुद्धा जास्त क्रिएटिव्ह, क्लिष्ट करू नका. साध्या लेआऊटमध्ये, योग्य फाँटचा वापर करा. कॉलम्स, टेबल्सचा वापर करु नका. एआय त्यांना वाचू शकत नाही. तुमचा अनुभव, शिक्षण, कौशल्य याची माहिती द्या.
2. कीवर्डचा योग्य वापर
तुमचा अनुभव आणि कौशल्य यांची सांगड घालणारे कीवर्डस् रिझ्युमेमध्ये असू द्या. ते नाहक जोडण्यात आले. जबरदस्ती ते घुसवण्यात आले असे वाटता कामा नये. अनुभव, कौशल्याशी निगडीत कीवर्ड्सचा वापर करा.
3.बुलेट पॉईंट्स योग्य ठिकाणी वापरा
बुलेट पॉईंट्स योग्य ठिकाणी वापरा. त्यामुळे तुमचा रिझ्युमे ठळक आणि ठसठशीतपणे समोर येईल. तो वाचणे सोप जाईल. तुमची माहिती एआय एल्गोरिदमला समजण्यास सोपे होईल.
4. तुमची योग्यता दाखवून द्या
एआय रिझ्युमेमध्ये तुमची योग्यता सिद्ध करा. तुम्ही या अगोदर केलेल्या कामाचे थोडक्यात मूल्यांकन मांडा. तुमच्यामुळे कंपनीला काय फायदा झाला, त्याची माहिती द्या. टीमचे नेतृत्व केले असेल, खास क्षेत्रात भरीव काम केले असेल. युझर्स वाढवले असतील तशी माहिती द्या.
5. कस्टमायजेशन
तुम्ही तुमच्या रिझ्युमेमध्ये कंपनी, पदानुसार थोडाबहुत बदल करा. कंपनीला कोणत्या कौशल्याची गरज आहे. त्याची हिरारीने मांडणी करा. तुमच्याकडे काय कौशल्य, अनुभव आहे, त्याची पाल्हाळ माहिती न देता, थोडक्यात पण अचूक माहिती द्या.
6. स्पेलिंग आणि ग्रामर
एआय सिस्टिम असल्याने तुमचा रिझ्युमेमध्ये भाषिक त्रुटी टाळा. स्पेलिंग आणि व्याकरणाकडे लक्ष द्या. तुमच्या रिझ्युमेमध्ये जास्त चुका असतील तर एआय सिस्टिम तो नाकारेल. तुमच्या रिझ्युमेचे प्रूफ तपासा.