नाशिक : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. वर्षा गायकवाड यांनी नाशिक येथे बोलताना येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम (Syllabus Change) बदलणार असल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या (CBSE) धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. वर्षा गायकवाड यांनी महापुरुषांच्या नावांवरुन करण्यात येणाऱ्या वादावर देखील भाष्य केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाववरून बाद निर्माण केला जातो, त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. दुसरीकडे ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असणारी रजा मंजूर करण्याचे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. पहिली दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदलानंतर नवा अभ्यासक्रम कसा असेल हे पाहावं लागणार आहे.
वर्षा गायकवाड यांनी येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलला जाणार असून तो आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार आहे, अशी माहिती दिली.
नेताजी सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यां नावाववरून वाद निर्माण केला जातो. त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. शाळांमध्ये ग्रंथोत्सव आणि शिक्षण उत्सव सुरू करणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शालेय शिक्षण विभाग प्रत्येक घराशी सबंधित विषय आहे. शाळांमध्ये शनिवार हा पुस्तक विरहित असावा,छंद जोपासण्यासाठी वेळ देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा डिसले गुरुजींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डिसले गुरुजींचा रजेचा अर्ज मंजूर करण्याचे शिक्षण विभागाला आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. उच्च शिक्षणासाठी डिसले गुरुजींनी रजेचा अर्ज केला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रणजित डिसलेंना फोन केल्याचं देखील समोर आलं आहे.
इतर बातम्या:
रणजितसिंह डिसलेंचा अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा, वर्षा गायकवाड यांच्याकडून रजा मंजुरीचे आदेश
School Education Minister Varsha Gaikwad said class first and second syllabus change