१६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडले, कौटुंबिक अत्याचाराशी लढून बनल्या IAS

| Updated on: Nov 26, 2024 | 4:45 PM

आदिवासी कुटुंबातील असलेल्या सविता प्रधान यांचा अवघ्या १६ व्या वर्षी विवाह लावून दिला होता. त्यानंतर त्यांनी संघर्ष करीत आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला असून आजही महिलांना प्रेरणा देत आहेत.

१६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडले, कौटुंबिक अत्याचाराशी लढून बनल्या IAS
Follow us on

मध्य प्रदेशच्या मंडई गावातील सविता प्रधान यांची कहाणी प्रेरणादायी आहे. एका आदिवासी कुटुंबातील असलेल्या सविता प्रधान यांचे जीवन आव्हानांनी भरलेले आहे. बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करुन स्कॉलरशिपच्या मदतीने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या त्यांच्या गावातील त्या पहिल्या महिला ठरल्या.त्यांनी नंतर सात किलोमीटर दूर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.त्यांच्या आईने पार्ट टाईम नोकरी करीत त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

सविता यांना डॉक्टर बनायचे होते.परंतू शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांचे लग्न एक श्रीमंत कुटुंबात करण्यात आले.कुटुंबाच्या दबावाने त्यांनी सोळाव्या वर्षी विवाह केला. लग्नानंतर त्यांचे आयुष्य आणखी बिकट झाले.त्यांचे पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांच्यावर अनेक बंधने लादली आणि कौटुंबिक अत्याचार केला. पतीची रोजची मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्यांनी त्यांचे जीवन नर्क बनविले.

कौटुंबिक छळाला कंटाळून सविताच्या मनात आत्महत्येचे विचार आले. परंतू मुलांचा चेहरा पाहून त्यांनी जगायचे ठरविले. त्याने २७०० रुपये घेऊन आपल्या दोन मुलांसह सासर सोडले.मुलांच्या पालनपोषण करण्यासाठी त्यांनी ब्युटी पार्लर उघडले.आणि अभ्यास सुरु केला. त्यानंतर भोपाळच्या बरकतुल्लाह युनिव्हर्सिटीतून त्यांनी पब्लिक एडमिस्ट्रेशनमधून बीए केले.शिक्षण घेताना त्यांनी राज्य सिव्हील सेवा परीक्षेबाबत ऐकले आणि अभ्यास करुन पहिल्याच प्रयत्नात २४ व्या वर्षी त्या परीक्षा पास झाल्या. आणि मुख्य नगरपालिका अधिकारी बनल्या.

हे सुद्धा वाचा

आयएएस बनण्याचा प्रवास

सविता प्रधान यांनी मेहनत आणि जिद्दीने अनेक बढत्या मिळविल्या अखेर त्या आयएएस अधिकारी बनल्या. आज त्या ग्वाल्हैर आणि चंबल क्षेत्राच्या अर्बन एडमिनिस्ट्रेशनच्या जॉईंट डायरेक्टर आहेत.

दूसरे लग्न आणि प्रेरणादायी काम

सविता यांनी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दुसरा विवाह केला. त्यांनी ‘हिम्मत वाली लड़कियां’ नावाने युट्युब चॅनल सुरु केले आहे. तेथे त्या महिलांना प्रेरणा देणारे व्हिडीओ टाकत मार्गदर्शन करीत असतात. त्यांची कहाणी संघर्ष आणि दृढता आणि यश याची प्रेरणादायी कहाणी आहे.