पुणे: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेच्या निकालासंदर्भात (TET exam) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप (Dattatray Jagtap) यांनी ही माहिती दिली आहे.राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतरच टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती जगताप यांनी दिली. पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police ) आरोग्य भरती घोटाळ्याचा तपास करत असताना सीईटी परीक्षेतील गैरप्रकाराची लिंक लागली होती. टीईटी परीक्षेतील घोटाळ्याचा तपास पूर्ण झाल्यानंतरच निकाल जाहीर होऊ शकतो. 21 नोव्हेंबर 20२1 रोजी टीईटी परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकाल तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर होऊ शकतो अशी माहिती आहे. परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यामुळे यावर्षी देखील निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. उमेदवारांना देखील निकालाची प्रतीक्षा आहे आहे. या परीक्षा घोटाळ्याशी संबंधित असल्यामुळे अटक करण्यात आलेल्या सुशील खोडवेकरला दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. शिक्षण विभागाच्या वतीने 2013 पासून सेवेत आलेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्यामुळे अनेकांची चिंता वाढलेली आहे.
राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतरच टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी ही माहिती दिली आहे. 21 नोव्हेंबर 2021 ला टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानं निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मात्र, उमेदवारांनाही निकालाची प्रतीक्षा लागलीय. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच निकाल लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील 2013 पासून सेवेत आलेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेनं शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा 7 हजार 800 जण पैसे देऊन पास झाल्याचं उघड झालंय. नियुक्त शिक्षकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मागवण्यात आलीत. पुणे जिल्ह्यातील 158 जणांनी आपली प्रमाणपत्र सादर केलीत.
टीइटी गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरचा जामीन अर्ज काल फेटाळण्यात आला. त्यानंतर खोडवेकर यांनी ॲड. एस. के. जैन व ॲड. अमोल डांगे यांच्यामार्फत अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या जामीन अर्जास सायबर पोलिसांच्या वतीने सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला होता. आरोपी प्रभावशाली पदावर काम करत असून, त्याच्या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपलेला नाही. राज्य सरकार त्याच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आरोपीला जामिनावर मुक्त करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील जाधव यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि आरोपीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर खोडवेकर यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला.
इतर बातम्या:
TET Exam Scam| TET परीक्षेत पैसे देऊन 7 हजार 800 परीक्षार्थी पास, पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर
TET exam Result update MSCE president Dattatray Jagtap said result declare after permission of State Government